शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांमधील सांडपाण्यामुळे घरात शिरतात साप; महिलांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

मागील वर्षभरापासून मनपा प्रशासनाने नाले सफाई न केल्यामुळे परिसरातील नाल्यांमध्ये सांडपाणी तुंबले आहे. पावसामुळे या समस्येत अधिकच वाढ झाली ...

मागील वर्षभरापासून मनपा प्रशासनाने नाले सफाई न केल्यामुळे परिसरातील नाल्यांमध्ये सांडपाणी तुंबले आहे. पावसामुळे या समस्येत अधिकच वाढ झाली असून, नाल्यांचे सांडपाणीच नव्हे; तर घरांमध्ये चक्क साप शिरत असल्याची माहिती उत्तर झाेनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २ मधील रहिवासी लीला खाेब्रागडे यांनी दिली. ही समस्या निकाली न काढता ‘जैसे थे’ ठेवण्याकडे मनपा प्रशासनाचा कल असल्याचा आराेप यावेळी परिसरातील असंख्य नागरिकांनी केला.

यंदा नाले सफाईसाठी मनपा प्रशासनाने तब्बल ७५ लाख रुपयांची तरतूद केली. झाेननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती न करता एकाच कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, मागील काही दिवसांपासून नाले सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. शहराच्या प्रत्येक भागात नियाेजनपूर्वक नाले सफाई केला जात असल्याचा गवगवा बांधकाम विभागातील काही विशिष्ट कर्मचाऱ्यांकडून केला जात असला तरी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. उत्तर झाेनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २ मधील नाले सफाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आराेप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. ‘लाेकमत’ चमूने प्रभागातील नाल्यांची प्रत्यक्षात पाहणी केली असता तुटलेल्या नाल्या, त्यात साचलेले सांडपाणी, दुर्गंधी, काटेरी झुडपे, गवत पसरल्याचे दिसून आले.

मागील अनेक महिन्यांपासून शंकर नगर, आपातापा राेड परिसरातील माेठ्या नाल्यांची साफसफाईच न केल्यामुळे सांडपाणी तुंबले आहे. यामुळे डासांची पैदास वाढली असून, पावसाळ्यात नाल्यांचे सांडपाणी घरात शिरते. प्रशासन कागदाेपत्री नालेसफाई करीत आहे.

- अशाेक कांबळे, रहिवासी, प्रभाग २

आपातापा राेड भागात साफसफाईअभावी नाल्यांमधील सांडपाणी अंगणात साचते. नळाच्या टाक्यात घाण पाणी साचत असल्याने त्याचा उपसा करावा लागताे. त्यानंतरच नळाच्या पाण्याचा वापर करता येताे. दुर्गंधीमुळे आम्ही त्रस्त आहाेत. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.

- अनिल गायकवाड, रहिवासी, प्रभाग २

संत कबीर नगरमध्ये नाल्यांमधील सांडपाणी वाहून जात नसल्याने मागील काही दिवसांपासून नाल्यांतील साप, विषारी जीवजंतू घरात शिरत आहेत. यामुळे आमच्या जीविताला धाेका निर्माण झाला आहे. आमच्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास मनपाच्या अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचण्यात येईल.

- लीला खाेब्रागडे, रहिवासी, प्रभाग २

लाडीसफैल भागातील नाले सफाईकडे मनपाने पाठ फिरवल्यामुळे आराेग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. काटेरी झुडपे, गवत वाढल्याने डासांची पैदास वाढली आहे. या समस्येकडे आयुक्त नीमा अराेरा यांनी जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

- सीमा काशिद, रहिवासी, प्रभाग २

प्रभागात ठिकठिकाणी नाले सफाईचा बाेजवारा उडाला असून, नागरिकांच्या अंगणात, घरात घाण पाणी शिरत असल्याची परिस्थिती आहे. ही समस्या साेडवण्यासाठी नागरिक दरराेज घरी येतात. मनपा कर्मचाऱ्यांकडून आयुक्तांची दिशाभूल केली जात आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदाेलनाशिवाय पर्याय नाही.

- चांदनी रवी शिंदे, नगरसेविका, प्रभाग २