शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्या बंदी असताना कत्तलखान्याला परवानगी

By admin | Updated: July 1, 2015 02:10 IST

महापालिकेचा प्रताप; जिल्हाधिका-यांच्या तंबीनंतर परवानगी रद्द.

अकोला: संपूर्ण राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना महापालिकेत सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या नाकावर टिच्चून कत्तलखान्याला परवानगी देण्याचा प्रताप आयुक्त सोमनाथ शेटे, प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उघडकीस आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अवघ्या दोन तासात आयुक्त सोमनाथ शेटे यांनी परवानगी रद्द न केल्यास आयुक्तांसह उपायुक्तांविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला. यावर आयुक्त शेटे यांनी परवानगी रद्दचे आदेश जारी केले. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार येताच गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला. अकोला मनपातही भाजप-सेना युतीचीच सत्ता असताना, आयुक्त सोमनाथ शेटे यांनी अकोटफैल भागात कत्तलखाना सुरू करण्यासाठी १७ जून रोजी परवानगी दिली. हा प्रकार मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात आयोजित प्राणी प्रतिबंधक क्लेष समितीमध्ये उघड झाला. अकोटफैलमधील कत्तलखान्याच्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती करण्यासंदर्भात आयुक्तांनी पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांना पत्रव्यवहार केल्याने हा गंभीर प्रकार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या लक्षात आला. अवघ्या दोन तासात ही परवानगी रद्द न केल्यास आयुक्तांसह उपायुक्त माधुरी मडावी यांच्याविरोधात फौजदारी तक्रारीचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला. यावर आयुक्तांनी कत्तलखान्याची परवानगी रद्द करण्याचे आदेश जारी केले.