शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

खैर मोहम्मद प्लॉटमध्ये बैलांची कत्तल करताना चौघे गजाआड

By admin | Updated: October 12, 2015 01:54 IST

डाबकी रोड पोलिसांची कारवाई, ५ बैलांना जीवनदान.

अकोला: खैर मोहम्मद प्लॉटमध्ये एका भग्नावस्थेत असलेल्या घरात रविवारी दुपारी बैलांची कत्तल सुरू असताना डाबकी रोड पोलिसांनी छापा मारून चार आरोपींना रंगेहात अटक केली. यामधील एक आरोपी नगरसेवकाचा भाऊ असल्याचे समोर आले असून, पोलिसांना या ठिकाणी एक बैल कापलेल्या स्थितीत आढळला, तर पाच बैलांची कत्तल करण्याची तयारी आरोपींनी चालविली होती. मात्र डाबकी रोड पोलिसांनी वेळीच छापा मारल्यामुळे चार बैलांना जीवनदान मिळाले. शहरातील गंगानगर परिसरातील गोवर्धन प्लॉटमध्ये तब्बल ४६ जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक सुरू अस ताना स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून या जनावरांना जीवनदान दिले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी खैर मोहम्मद प्लॉटमध्ये शेख अनिस शेख मुमजात, शेख मुमताज शेख रसूद, नजीर अहमद अब्दुल बशीर व शेख निसार शेख गफ्फार या चार जणांनी बैलांची कत्तल सुरू केल्याची माहिती डाबकी पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी खैर मोहम्मद प्लॉट येथील घटनास्थळावर छापा मारून पाच बैलांना जीवनदान दिले. मात्र एका बैलाची पूर्णपणे कत्तल झाली होती. त्यामुळे पोलीस त्या बैलाचे प्राण वाचवू शकले नाहीत. डाबकी रोड पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई डाबकी रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उ पनिरीक्षक पांडे, महेंद्र बहादूरकर, प्रभाकर मोगरे, राजू वानखडे, गोपाल ठाकूर व भारत इंगळे यांनी केली. शहरात गत एक महिन्यात गोवंशाची कत्तल तसेच वाहतूक करीत असताना पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत २00 च्यावर गोवशांना जीवनदान देण्यात आले आहे. काही आरोपींवर गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र त्यानंतरही गोवंशाची मोठय़ा प्रमाणात कत्तल सुरू असल्याचे शनिवारी व रविवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईमधून स्पष्ट होत आहे. या चारही आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.