शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

मधमाश्यांच्या हल्ल्यात सहा जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:18 IST

कुरूम : येथून जवळच असलेल्या माटोडा येथे मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविल्याने वेगवेगळ्या तीन घटनांत सहा जण गंभीर जखमी ...

कुरूम : येथून जवळच असलेल्या माटोडा येथे मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविल्याने वेगवेगळ्या तीन घटनांत सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त महितीनुसार, माटोडा येथील रहिवासी बंडू मधुकरराव बोरकर (५२) हे पत्नी माधुरी (वय ४५ वर्षे), मुलगी आकांक्षा (वय १४ वर्षे) हे तिघे जण शनिवारी सकाळी ११ वाजतादरम्यान शेतात मळणी यंत्रातून काढलेल्या गव्हाची गंजी शेतातच वाळू घालण्यासाठी गेले असता मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला. यामध्ये तिघेही जखमी झाले. दुसऱ्या घटनेत शालीकराम बोरकर (७०) व त्यांचा नातू नीलेश बोरकर (१६) यांच्यावरसुद्धा शेतात मधमाश्यांनी अचानक हल्ला करून जखमी केले. तिसरी घटना शुक्रवारी १२ मार्चला घडली. येथील अभिमान मेश्राम (४०) शेतात जात असताना शेत रस्त्यावर त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमींवर कुरूम येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.