शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांची सहा प्रकरणे मदतीसाठी पात्र!

By admin | Updated: March 7, 2017 02:18 IST

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची सहा प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली.

अकोला, दि. ६- शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची सहा प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, चार शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली.जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हय़ातील शेतकरी आत्महत्यांच्या १0 प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील एकनाथ रामराव बोरकर, मूर्तिजापूर तालुक्यातील बिडगाव येथील आनंदा रामकृष्ण वानखडे, तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील रामरतन सेवकराम दातकर, पातूर तालुक्यातील सावरखेड येथील गोविंदा सीताराम झळके, अकोला तालुक्यातील कानशिवणी येथील विजय रामेश्‍वर वाघमारे व निंबी मालोकार येथील नितीन प्रकाश इंगळे इत्यादी सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. उर्वरित चार शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीला समितीचे सदस्य शिवाजीराव देशमुख, डॉ. प्रमोद चोरे, डॉ. बाबाराव शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक डी.सी. खंडेराव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.