शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-भाजपामध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत

By admin | Updated: August 25, 2014 02:25 IST

खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत प्राप्त होत आहेत.

अनिल गवई / खामगावजिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या खामगाव विधानसभा मतदारसंघात २0१४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत प्राप्त होत आहेत. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या माध्यमातून काँग्रेसने भाजप-सेना युतीला चारीमुंड्या चीत केले आहे. आमदार सानंदा यांच्या विजयी घोडदौडीमुळे भाजपचे बलाढय़ नेते आ. भाऊसाहेब फुंडकर या मतदारसंघात चांगलेच हतबल झाले आहेत. आता मोदी लाटेवर स्वार होत भाजप-सेना महायुतीने मतदारसंघ ताब्यात घेण्याचे स्वप्नं रंगविले आहे, त्यामुळे भाजपाला आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह भारिप बहुजन महासंघासोबतही लढत द्यावी लागणार असून, ही लढत तुल्यबळ होईल.खामगाव मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांंपासून आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे एकछत्री वर्चस्व आहे. काँग्रेस पक्षाकडे आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासारखा सक्षम उमेदवार कुणीही नाही. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार सानंदा यांचे तिकीट निश्‍चित मानले जात आहे. दुसरीकडे भाजप उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्या आहेत. भारतीय जनता पक्षाकडून अँड. आकाश फुंडकर, उद्योजक संतोषसेठ डिडवाणी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. भाजपाला तीनदा पराभव पत्करावा लागल्यामुळे यंदा माजी विरोधी पक्षनेते आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी प्रत्यक्ष रिंगणात उतरविण्याची रणनीती भाजपच्या प्रदेश स्तरावरील नेत्यांची आहे. या पृष्ठभूमीवर खामगाव मतदारसंघात आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्याशी होणारी लढत ही राजकीय प्रतिष्ठेची होणार आहे. लोकसभेतील मोदी त्सुनामीचा फायदा घेण्यासाठी ऐनवेळी अँड. आकाश फुंडकर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. या निवडणुकीत भारिप बहुजन महासंघानेही अशोक सोनोने यांच्या रूपाने पुन्हा आव्हान देण्याची तयारी चालविली आहे. सोबतच मुस्लीम लीगचे दिलशाद पहेलवान यांनीही निवडणुकीची रणनीती आखली आहे. काँग्रेसकडून आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासोबतच एनएसयूआयचे तेजेंद्रसिंह चौहान आणि महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष तब्बसुम हुसेन यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र, आमदार सानंदा यांचे तिकीट कापणे दोघांनाही शक्य नाही. त्यामुळे विजयाचा चौकार ठोकण्यासाठी आमदार सानंदा नव्या दमाने भिडले असल्याचे चित्र मतदारसंघात आहे; मात्र मोदी लाटेमुळे कोणतीही रिक्स घेण्यात ते तयार नाहीत. विधानसभा निवडणुकीपूर्वी खामगाव विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवत त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच पदाचा खांदेपालट केला आहे. त्यामुळेच होणारी लढत तुल्यबळच होईल. त्यादृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी वरिष्ठांकडे उमेदवारीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे मुंबईच्या चकरा वाढलेल्या दिसून येत आहे.*महायुतीची उमेदवारी फुंडकर कुटुंबीयांकडेच!विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना, रिपाइं महायुतीच्या उमेदवारीसाठी आ. भाऊसाहेब फुंडकर, अँड. आकाश फुंडकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तथापि, दोघांपैकी कुणाचीही उमेदवारी जाहीर झाल्यास फुंडकर पिता-पुत्रांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. या दोघांपैकी कुणीही रिंगणात राहिले तरी खरा सामना हा दोन आमदारांचा आहे.