शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पातूर ‘बीडीओं’ना कारणे दाखवा नोटीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2016 03:01 IST

शौचालय बांधकामात अनियमितता भोवली.

अकोला, दि. १२: जिल्हय़ातील पातूर तालुक्यात दोन शौचालय बांधकामात अनियमितता झाल्याच्या मुद्दय़ावर पातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यास (बीडीओ) कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत सोमवारी देण्यात आले. पातूर तालुक्यात दोन शौचालय बांधकामासाठी शोषखड्डय़ाच्या कामात अनियमितता झाल्याचा मुद्दा सदस्य राजेश खोने यांनी सभेत उपस्थित केला. त्यानुषंगाने यासंदर्भात पातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावून अहवाल मागविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सभेत सांगितले. समितीच्या मागील सभेच्या इतवृत्ताला या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.समाजकल्याण, महिला बालकल्याण समितीची सभा निर्णयाविना!जिल्हा परिषद समाजकल्याण समिती आणि महिला व बालकल्याण समितीची सभा सोमवारी घेण्यात आली; मात्र या दोन्ही समितींच्या सभेत केवळ मागील सभेच्या इतवृत्ताला मंजुरी देण्यात आली. इतर विषयावर कोणतीही चर्चा आणि निर्णय घेण्यात आला नसल्याने, दोन समितींच्या सभा निर्णयाविनाच पार पडल्या. या सभेला संबंधित सभापतींसह समितींचे सदस्य उपस्थित होते.