शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक: एकट्या एप्रिलमध्येच कोरोनाचे २२५ बळी, १२ हजारांवर पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:17 IST

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी स्थिती जिल्ह्यात पाहावयास मिळाली, मात्र तरीदेखील अकोलेकरांना याचे गांभीर्य दिसत नसल्याची स्थिती आहे. ...

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी स्थिती जिल्ह्यात पाहावयास मिळाली, मात्र तरीदेखील अकोलेकरांना याचे गांभीर्य दिसत नसल्याची स्थिती आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट ठाण मांडून आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला ; मात्र फेब्रुवारी महिन्यापासून सक्रिय झालेल्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या शेकडोंनी वाढत आहे. एप्रिल महिन्यातील स्थिती पाहता प्रतिदिवस सरासरी ३७० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दरम्यान, सद्य स्थितीत जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांत खाटांची कमतरता भासत असून खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचीही टंचाई दिसून येत आहे. शिवाय खासगीत रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांची धाव ही सर्वोपचार रुग्णालयाकडे आहे. परिणामी आरोग्य सेवेवर ताण येत आहे. कोविड फैलावाची स्थिती अशीच कायम राहिल्यास खाटा, ऑक्सिजन आणि इतर साधनसामग्रीची टंचाई भासून परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून संसर्ग रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.

आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू एप्रिल महिन्यात

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक ८४ मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले होते, मात्र मार्च महिन्यात हे रेकॉर्ड मोडले गेले. एकट्या एप्रिल महिन्यात २२५ रुग्णांना जीव गमवावा लागला. ही परिस्थिती आतापर्यंतची सर्वाधिक गंभीर परिस्थिती असल्याचे दिसून येते.

असा आहे कोरोनाचा आलेख

महिना- रुग्ण - मृत्यू

एप्रिल - २८ - ०३

मे - ५५३ - २९

जून - ९६९ - ४७

जुलै - १०८७ - ३४

ऑगस्ट - १४०० - ४७

सप्टेंबर - ३४६८ - ८४

ऑक्टोबर - ८९३ - ४५

नोव्हेंबर - १०३३ - १२

डिसेंबर - १०५८ - २९

जानेवारी - ११३५ - १४

फेब्रुवारी - ४५२७ - ३१

मार्च - ११५५५ - ८६

एप्रिल - १२,१२४ - २२५

१२ हजारांवर रुग्णांनी केली कोरोनावर मात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक १२ हजार १२४ रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आले, मात्र त्यापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली. एप्रिल महिन्यात तब्बल १२ हजार २३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असली, तरी दररोज येणारे अनेक पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूचा वाढता आकडा चिंता वाढविणारा ठरत आहे.