शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे रुमणे आंदोलन आता जिल्हाभरात

By admin | Updated: May 29, 2017 01:49 IST

पूर्वतयारीसाठी खासदार अरविंद सावंत अकोल्यात

अकोला : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, यासाठी आग्रही भूमिका घेतलेल्या शिवसेनेने बाळापूर तालुक्यानंतर आता संपूर्ण जिल्ह्यात रुमणे आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. आंदोलनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत सोमवारी अकोल्यात दाखल होत आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सोयाबीन, तुरीला हमीभाव तर सोडाच, त्यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी राज्य सरकार पूर्णत: अपयशी ठरल्याचे चित्र आहे. परिणामी, भरघोस उत्पन्न होऊनदेखील कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, तर कर्जमुक्ती देण्याची मागणी करीत शिवसेनेने भाजपावर तीव्र हल्ला चढवल्याचे चित्र आहे. कर्जमुक्तीच्या मागणीसाठी संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली बाळापूर तालुक्यात रुमणे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी काढलेल्या मोर्चाची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जिल्ह्यात रुमणे मोर्चाचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पृष्ठभूमीवर संपर्क प्रमुख अरविंद सावंत मोर्चाचे नियोजन करण्यासाठी सोमवारी सकाळी अकोल्यात दाखल होत आहेत. या अगोदर काढण्यात आलेल्या रूमणे मोर्चाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांसमोर अनंत अडचणी असून त्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला भाव तर नाहीच शिवाय शेतकऱ्यांची अडवणूकही केली जात आहे. त्यांच्या या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेनेने रूमणे मोर्चाचे आयोजन केले आहे. आता रूमणे मोर्चाचे नियोजन करण्यात आले असून ते आता जिल्हाभर राबविले जाणार आहे. तीन तालुक्यांत निघणार मोर्चाबाळापूर तालुक्यानंतर शिवसेनेचा रुमणे मोर्चा आता अकोट, मूर्तिजापूर आणि अकोला तालुक्यात काढल्या जाणार आहे. त्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, रवींद्र पोहरे, दिलीप बोचे, मुकेश मुरूमकार, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर तसेच सर्व तालुका प्रमुख कामाला लागले आहेत. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘मी कर्जमुक्त होणारच’ अभियान सुरू केले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेत नसले, तरी शिवसेनेला याची जाण आहे. -अरविंद सावंत, संपर्क प्रमुख शिवसेना.