शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

निवासी उपजिल्हाप्रमुख पदासाठी शिवसेनेत ‘लॉबिंग’

By admin | Updated: October 22, 2016 02:42 IST

मुंबईतून जाहीर होणार नाव

अकोला, दि. २१- शिवसेनेच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीत फेरबदल केल्यानंतर निवासी उपजिल्हाप्रमुख पद रिक्त ठेवण्यात आले होते. पक्षात या पदासाठी नवीन चेहर्‍याला संधी देण्याच्या हालचाली सुरू होताच इच्छुकांनी वरिष्ठांची मनधरणी सुरू केली होती. येत्या दोन दिवसांत मुंबईतून निवासी उपजिल्हाप्रमुख पदासाठी संभाव्य दावेदाराचे नाव जाहीर केले जाणार असल्याची माहिती आहे.शिवसेनेच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीमध्ये पश्‍चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी मोठय़ा प्रमाणात उलथापालथ केली. तब्बल अकरा वर्षांंनंतर सेनेची जिल्हा कार्यकारिणी पूर्णत: बदलण्यात आली. आगामी नगरपालिका व महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केलेला प्रयोग पक्षासाठी फायदेशीर ठरणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. जिल्हा कार्यकारिणी जाहीर करताना जिल्हाप्रमुख, चार उपजिल्हाप्रमुखांच्या नावाची घोषणा करण्यात आली. कार्यकारिणीतील निवासी उपजिल्हाप्रमुख पद मात्र रिक्त ठेवण्यात आले. सदर पद का रिक्त ठेवले, याबद्दल पक्षात चांगलीच चर्चा रंगली होती. तूर्तास या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. वरिष्ठ नेत्यांकडून निवासी उपजिल्हाप्रमुख पदासाठी दावेदाराचा शोध सुरू होताच अनेकांनी पक्षाकडे ह्यलॉबिंगह्ण सुरू केली. या पदासाठी नवीन चेहर्‍याला संधी दिली जाण्याची शक्यता असून, येत्या दोन दिवसांत संभाव्य नावाची घोषणा होणार असल्याची माहिती आहे.सर्वांंना सामावून घेण्याचा प्रयत्नसेनेचे पश्‍चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी जिल्हा व शहर कार्यकारिणीत फेरबदल करीत अनेकांना आश्‍चर्याचे धक्के दिले. अकरा वर्षांंच्या कालावधीनंतर कार्यकारिणी बदलण्याचा निर्णय पक्षासाठी नवसंजीवनी ठरण्याची चर्चा रंगली आहे. जिल्हा कार्यकारिणीत सर्वांंना सामावून घेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.