शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा लाख लीटर्स बनावट दारू जप्त

By admin | Updated: December 27, 2014 23:48 IST

वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यभर कारवाई.

अनिल गवई / खामगाव: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने १ मार्च ते १५ डिसेंबरच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत तब्बल साडेसहा लाख लीटर्स देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत अवैध मद्य विक्री तसेच गावठी दारू तयार करण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने गुप्त माहिती व भरारी आणि अचानक तपासणी मोहिमेंतर्गत राज्यभर मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान, इतर राज्यातून चोरट्या मार्गाने (उत्पादन शुल्क बुडवून) आणण्यात आलेल्या देशी, विदेशी दारूच्या साठय़ासह सुमारे साडेसहा लाख लीटर्स बनावट दारू जप्त करण्यात आली. यामध्ये सात लक्ष ३२ हजार लीटर्स देशी दारूचा समावेश असून ९ हजार लीटर्स विदेशी दारूचा समावेश असल्याची माहिती आहे.*नवीन वर्षाच्या स्वागत पाटर्य़ांवरही करडी नजरनवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठय़ा प्रमाणात देशी, विदेशी दारूचा वापर केला जातो. यासाठी राज्यात देशाच्या कानाकोपर्‍यातून देशी, विदेशी दारूची चोरटी आयात केली जाते. त्यामुळे राज्याचा महसूल बुडतो. मात्र, यंदा दारूच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपली दृष्टी वळविली आहे. ३१ डिसेंबरपूर्वी अचानक तपासणी पथकाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात दारू जप्त केली जाणार असल्याचे संकेत आहेत.*साडेतीन हजारांवर गुन्हे!देशी आणि विदेशी दारूच्या तस्करीसोबतच बनावट मद्य विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने १५ डिसेंबरपर्यंत तब्बल तीन हजार ५४७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तसेच १८00 जणांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे हातभट्टीसाठी वापरण्यात येणारा दीड लाख लीटर्स इतका कच्चा मालही जप्त करण्यात आला आहे.