शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ चारूदत्त मायी विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर

By admin | Updated: July 19, 2016 00:28 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यपाल प्रतिनिधी म्हणून राज्याचे राज्यपाल तथा कुलपतींनी त्यांची निवड केली आहे.

अकोला: आपल्या कार्यकुशलतेने विदर्भाचे नाव देश-विदेशात उज्‍जवल करणारे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. चारूदत्त मायी यांची अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यपाल प्रतिनिधी म्हणून राज्याचे राज्यपाल तथा कुलपतींनी त्यांची निवड केली आहे. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर वैदर्भीय शेती शाश्‍वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी शासन-शेतकरी-शास्त्रज्ञ यामधील दुवा म्हणून कार्यकारी परिषद सदस्य भूमिका बजावत असतात. डॉ मायी यांच्या रूपाने अतिशय अनुभवी, कर्तव्यतत्पर, दूरदृष्टी असणारा कृषी शास्त्रज्ञ कार्यकारी परिषदेवर लाभला ही सर्व शेतकरी, कृषी विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शासन दरबारी प्रलंबित असलेले प्रश्न आता निकाली लागण्यास मदत होईल, असा आशावाद विद्यापीठ स्तरावर व्यक्त होत आहे. डॉ. चारूदत्त मायी यांचा जन्म १५ जुलै १९४६ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षणापासूनच त्यांनी संपूर्ण शिक्षण गुणवत्तेसह पूर्ण केले. आचार्य पदवीमध्येसुद्धा सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्लीद्वारा त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये कुलगुरू, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी; संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर; कृषी आयुक्त, भारत सरकार, नवी दिल्ली इत्यादी महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ (एएसआरबी), नवी दिल्ली या अतिशय महत्त्वाच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉ. मायी यांनी २0११ सालापर्यंत काम बघितले आहे.