सन २0१६-१७ ची ४१ कामे पूर्ण होण्याच्या मार्गावरतेल्हारा : जलसिंचनात मोठय़ा प्रमाणात वाढ व्हावी म्हणून तालुक्यात मागील वर्षी जलयुक्तची मोठय़ा प्रमाणात कामे झाली. सन २0१६-१७ ची ४१ कामे तालुक्यात चालू असून, सन २0१७-१८ करिता १६ गावांची निवड करण्यात आली. राज्य शासन प्रत्येक गावात पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, यासाठी मागील पाच वर्षांपासून कृ षी विभाग, जलसंधारण उपविभाग अकोट, लघुसिंचन विभागामार्फत तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणात मंजूर झाली होती. यामध्ये सन २0१५-१६ मध्ये तालुक्यातील ३८ गावांची निवड होऊन ७५१ कामे मंजूर होऊन त्यामधील ६८0 कामे पूर्ण झाली होती. उर्वरित ७१ कामे सन २0१६-१७ मध्ये पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये खोलीकरण करणे, गाळ काढणे व बंधार्यांची कामे आहेत. सन २0१७-१८ मध्ये तालुक्यातील १६ गावांचीच सदर कामांसाठी निवड करण्यात आली. यामध्ये सांगवी, खापरखेडा, अटकळी, खेलसटवाजी, खेलदेशपांडे, तळेगाव बु., मालठाणा बु., मालपुरा, पिवंदळ बु., शिवाजी नगर, उकळी बु., तुदगाव, तळेगाव पातुर्डा व अन्य गावांची निवड करण्यात येऊन सदर गावात शिवारफेरी काढून १५ मेपर्यंत आराखडे सादर करायची आहेत. तसा सर्व्हे कृ षी विभागाकडून चालू असला, तरी मागील वर्षाच्या तुलनेत जलयुक्तच्या कामासाठी तब्बल २२ गावांची निवड करण्यात आली. शासनाने जलयुक्तच्या कामासाठी अजूनही इतर गावांची निवड केल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जलसिंचनामध्ये वाढ होईल. मागील तीन वर्षांमध्ये झालेल्या कामांमुळे बर्याच गावांतील पाण्याची पातळी वाढलेली दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)राज्य शासन पाण्याची पातळी वाढावी म्हणून जलयुक्त शिवाराची कामे मोठय़ा प्रमाणात करीत असले, तरी तालुक्यात होत असलेल्या कामांना कोणत्याही लोकप्रतिनिधीने भेट देऊन पाहणी केल्याचे ऐकिवात नाही, त्यामुळेच कमी गावांची निवड करण्यात आली.सन २0१७-१८ मध्ये जलयुक्तच्या कामासाठी १६ गावांची निवड करण्यात येऊन १५ मेपर्यंत शिवारफेरी काढून वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविले जातील.- सागर इंगोले,तालुका कृ षी अधिकारी, तेल्हारा.
तेल्हारा तालुक्यात जलयुक्तच्या कामांसाठी १६ गावांची निवड
By admin | Updated: May 9, 2017 19:46 IST