शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुक्यात जलयुक्तच्या कामांसाठी १६ गावांची निवड

By admin | Updated: May 16, 2017 01:56 IST

सन २०१६-१७ ची ४१ कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : जलसिंचनात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी म्हणून तालुक्यात मागील वर्षी जलयुक्तची मोठ्या प्रमाणात कामे झाली. सन २०१६-१७ ची ४१ कामे तालुक्यात चालू असून, सन २०१७-१८ करिता १६ गावांची निवड करण्यात आली. राज्य शासन प्रत्येक गावात पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, यासाठी मागील पाच वर्षांपासून कृ षी विभाग, जलसंधारण उपविभाग अकोट, लघुसिंचन विभागामार्फत तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर झाली होती. यामध्ये सन २०१५-१६ मध्ये तालुक्यातील ३८ गावांची निवड होऊन ७५१ कामे मंजूर होऊन त्यामधील ६८० कामे पूर्ण झाली होती. उर्वरित ७१ कामे सन २०१६-१७ मध्ये पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये खोलीकरण करणे, गाळ काढणे व बंधाऱ्यांची कामे आहेत. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यातील १६ गावांचीच सदर कामांसाठी निवड करण्यात आली. यामध्ये सांगवी, खापरखेडा, अटकळी, खेलसटवाजी, खेलदेशपांडे, तळेगाव बु., मालठाणा बु., मालपुरा, पिवंदळ बु., शिवाजी नगर, उकळी बु., तुदगाव, तळेगाव पातुर्डा व अन्य गावांची निवड करण्यात येऊन सदर गावात शिवारफेरी काढून १५ मेपर्यंत आराखडे सादर करायची आहेत. तसा सर्व्हे कृ षी विभागाकडून चालू असला, तरी मागील वर्षाच्या तुलनेत जलयुक्तच्या कामासाठी तब्बल २२ गावांची निवड करण्यात आली. शासनाने जलयुक्तच्या कामासाठी अजूनही इतर गावांची निवड केल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जलसिंचनामध्ये वाढ होईल. मागील तीन वर्षांमध्ये झालेल्या कामांमुळे बऱ्याच गावांतील पाण्याची पातळी वाढलेली दिसत आहे. सन २०१७-१८ मध्ये जलयुक्तच्या कामासाठी १६ गावांची निवड करण्यात येऊन १५ मेपर्यंत शिवारफेरी काढून वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविले जातील.- सागर इंगोले, तालुका कृ षी अधिकारी, तेल्हारा.