शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या सभांवर सुरक्षा यंत्रणा सावध

By admin | Updated: October 1, 2014 23:23 IST

भाजप नेत्यांमध्ये रस्सीखेच; १६ सभाच शक्य.

अकोला: विधानसभा निवडणुकीत सभा गाजविण्यासाठी भाजपकडे राज्यात सक्षम चेहराच नसल्याने पक्षाचे स्टार प्रचारक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जास्तीत जास्त सभा आपल्याच भागात व्हाव्यात, यासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असून, याबाबत सुरक्षा यंत्रणेनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. सुरक्षेचा आढावा घेवूनच मोदींच्या सभांचे नियोजन करण्यात येईल, असे सुरक्षा यंत्रणेने स्पष्ट केल्याने भाजप नेत्यांची गोची झाली आहे. महाराष्ट्रात मोदींच्या २३ ते २६ सभा व्हाव्यात अशी भाजप नेत्यांची इच्छा असली तरी, सुरक्षा यंत्रणेकडून केवळ १५ ते १६ सभांना हिरवी झेंडी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपकडे महाराष्ट्रात सभा गाजवेल, असा नेताच शिल्लक नाही. अशातच राज्यात युतीमध्ये ताटातूट झाल्याने शिवसेना-भाजप स्वतंत्र लढत आहे. भाजपने ह्यअब महाराष्ट्र, सब महाराष्ट्रह्ण, असा नारा दिला असला तरी, तशी वातावरणनिर्मिती राज्यात अद्याप झालेली नाही. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभांसाठी साकडे घातले आहे. मोदी यांच्या सभांना ४ ऑक्टोबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. भाजपची ताकद कमी असलेल्या मतदारसंघांमध्ये मोदींच्या सभांचे नियोजन करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त मोदी यांच्या १0 ते १२ रॅलींचेही आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.