शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक संघटनांमार्फत घेणार शाळाबाह्य विद्यार्थ्यांंचा शोध

By admin | Updated: November 2, 2015 02:54 IST

वर्षभर राबविण्यात येणार मोहीम.

प्रवीण खेते / अकोला : सर्व शिक्षा अभियानांतर्गत ४ जुलै रोजी राज्यभर एक दिवसीय शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली होती. परंतु, या सर्वेक्षणातून अनेक शाळाबाह्य बालकांची नोंद झाली नसल्याचे मत काही सामाजिक संघटनांनी मांडले होते. या संदर्भात सामाजिक संघटनांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने नव्याने शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये सामाजिक संघटनांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. शिक्षण आरटीई अँक्ट २00९ नुसार ६ ते १४ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. कायद्यानुसार या वयोगटातील प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावा, या अनुषंगाने दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांंचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्या जाते. परंतु, दरवर्षी या सर्वेक्षणामध्ये अनेक शाळाबाह्य बालकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे वास्तवदेखील आहे. त्यामुळे यंदा ४ जुलै रोजी राज्य स्तरावर शाळाबाह्य बालकांच्या शोधासाठी एक दिवसाची विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत राज्यातील शिक्षकांसोबतच इतर शासकीय कर्मचार्‍यांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांंचा घरोघरी जाऊन शोध घेतला. शोध मोहिमेनंतर समोर आलेल्या राज्यातील शाळाबाह्य बालकांच्या आकडेवारीवर काही सामाजिक संघटनांनी आक्षेप नोंदविला. ही आकडेवारी खरी नसून, अद्यापही बर्‍याच शाळाबाह्य बालकांची नोंद शिल्लक असल्याचे सांगत यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी सामाजिक संघटनांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली होती. या संदर्भात शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर शाळाबाह्य बालकांचा नव्याने शोध घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी राज्यातील सामाजिक संघटनांची मदत घेण्यात येणार असून, ही प्रक्रिया निरंतर चालणार आहे. त्या अनुषंगाने राज्यात जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे. यामध्ये सामाजिक संघटनांना सहभागी करण्यात येत आहे.