शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदेत वाहून गेलेल्या दोन्ही युवकांचा शोध सुरूच !

By admin | Updated: August 25, 2016 01:59 IST

अकोला जिल्हा प्रशासन मध्य प्रदेश सरकारच्या संपर्कात; नदीकाठावरील ७0 गावांमध्ये शोधमोहीम.

अकोला, दि. २४: राधाकिसन प्लॉटमधील भाटियावाडी येथील रहिवासी तसेच कुल्फी विक्रेता आणि तोष्णीवाल ले-आउट परिसरातील पिंपळेनगर येथील रहिवासी दोन युवक मध्यप्रदेशातील ओंकारेश्‍वर येथील नर्मदा नदीत मंगळवारी सकाळी वाहून गेले. या युवकांचा दोन दिवसांपासून शोध घेण्यात येत असून, त्यांचा थांगपत्ता पोलीस प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन पथकाला लागलेला नाही. दोन्ही युवकांच्या शोधासाठी नर्मदा नदीकाठावरील ७0 गावांत पाहणी करण्यात आली; मात्र त्यांचा शोध लागला नसल्याची माहिती योगेश पाठक यांचे बंधु राजेश पाठक यांनी दिली. मध्यप्रदेशातील उज्जैन आणि ओंकारेश्‍वर येथे सोमवारी दर्शनासाठी शहरातील तोष्णीवाल ले-आउट आणि राधाकिसन प्लॉट येथील तब्बल १८ युवकांची चमू शनिवारी रात्री अकोल्यातून रवाना झाली होती. मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास संजय जोशी त्यांचा मोठा भाऊ बंटी जोशी आणि योगेश पाठक हे तिघे नर्मदा नदीत आंघोळ करीत असताना नदीचा प्रवाह अचानक वाढल्याने योगेश पाठक आणि संजय जोशी हे दोघे पाण्यात वाहून गेले. मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास हे दोघे नदीमध्ये वाहून गेल्यानंतर मध्यप्रदेश पोलीस प्रशासन, आपत्कालीन पथकांनी या दोन युवकांचा शोध सुरू केला आहे. मंगळवारी पहाटेपासून या दोन युवकांचा शोध घेण्यात येत असला तरी बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत त्यांचा कुठलाही पत्ता लागलेला नाही. या नदी पात्रात एका युवकाचा मृतदेह मिळाल्याची माहिती मंगळवारी रात्री समोर आली होती; मात्र ही अफवा असल्याचेही स्पष्ट झाले आहे.