शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘सायन्स एक्स्प्रेस’ला हवा अकोल्यात थांबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:30 IST

‘मॉडेल’ रेल्वेस्थानकास वगळून मूर्तिजापूरला दिले प्राधान्य

राम देशपांडे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दिल्ली (सफदरगंज) रेल्वेस्थानकावरून १७ फेब्रुवारी रोजी ‘सायन्स एक्स्प्रेस’ देशभ्रमंतीला निघाली आहे. वातावरणातील बदलाची माहिती देण्यासाठी निघालेल्या या विशेष गाडीला देशातील ६८ रेल्वेस्थानकांवर थांबा देण्यात आला आहे; मात्र या यादीतून ‘मॉडेल’ म्हणून ओळख असलेल्या अकोला रेल्वेस्थानकास वगळण्यात आले आहे. मॉडेल स्टेशन वगळून मूर्तिजापूरसारख्या तालुकास्तरीय रेल्वेस्थानकावर तिला २७ ते २९ जुलै थांबा देण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील अकोला हे शहर पूर्वीपासून व्यापारी दृष्टिकोनातून नावाजलेले आहे. कृषी विद्यापीठ तसेच अनेक शाळा व महाविद्यालय असलेल्या या शहरात विविध ठिकाणाहून विद्यार्थी शिक्षणानिमित्त येतात. शिक्षणाचे हब म्हणून नावारूपास आलेल्या अकोला शहराच्या रेल्वेस्थानकाला ‘मॉडेल’ रेल्वेस्थानकाचा दर्जा लाभला आहे. बदलते वातावरण आणि जागतिक हवामानाची माहिती शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक व इतर सर्वसामान्य नागरिकांना करून देण्याच्या दृष्टिकोनातून डिपार्टमेंट आॅफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने २00७ पासून १६ डब्यांच्या ‘सायन्स एक्स्प्रेस’चा श्रीगणेशा करण्यात आला. जास्तीत जास्त नागरिकांना पाहता यावे या दृष्टिकोनातून हे चालते-फिरते वैज्ञानिक प्रदर्शन दरवर्षी देशातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर थांबविले जाते. १४ जुलै रोजी रत्नागिरीमार्गे राज्यात दाखल झालेल्या या गाडीला २७ ते २९ जुलैदरम्यान मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात आला आहे. वास्तविक पाहता अकोल्यासह आसपासच्या अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी ओढा अकोल्याकडेच अधिक असतो. मूर्तिजापूरसारख्या तालुकास्तरीय रेल्वेस्थानकाऐवजी ‘मॉडेल’ रेल्वेस्थानक म्हणून ओळख असलेल्या अकोला रेल्वेस्थानकावर ‘सायन्स एक्स्प्रेस’ला थांबा दिल्यास त्यास जास्तीत जास्त प्रतिसाद लाभू शकतो. यासाठी लोकप्रतिनिधी, रेल्वे प्रवासी संघ आणि सामाजिक संघटनांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील.