अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पोलिस मुख्यालय कवायत मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेवर स्कूल ऑफ स्कॉलर्सचे वर्चस्व राहिले. शनिवार २३ ऑगस्ट रोजी १७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटातील सामने घेण्यात आले. १७ वर्षाआतील मुलांच्या गटात हिंदू ज्ञानपीठ व स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणा रोड शाखा संघात सामना झाला. हिंदू ज्ञानपीठने हा सामना २-0 ने जिंकला. मुलींच्या गटातील सामना स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणा रोड व स्कूल ऑफ स्कॉलर्स बिर्ला शाखा यांच्यात अंतिम सामना झाला. १-0 ने सामन्यावर हिंगणा शाखेने ताबा घेतला. १९ वर्षाआतील मुलांच्या गटातील सामन्यात शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाने ३-0 ने मेहरबानू कनिष्ठ महाविद्यालयावर विजय मिळविला. मुलींच्या गटातील सामना स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणा रोड व नोएल इंग्लिश स्कूलमध्ये होऊन सामना १-0 ने स्कूल ऑफ स्कॉलर्सने जिंकला.स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने होते. पंच म्हणून मयूर निंबाळकर, स्वप्निल अंभोरे, राजू उगवेकर, अक्षय निंबाळकर, शुभम अढावू, सुनील यादव यांनी काम पाहिले.
स्कूल ऑफ स्कॉलर्सचे हॉकी स्पर्धेवर वर्चस्व
By admin | Updated: August 24, 2014 00:45 IST