शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

संजय धोत्रे, भावना गवळी मंत्रिपदाचे दावेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 13:04 IST

भावना गवळी व संजय धोत्रे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

- राजेश शेगोकारअकोला: लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने विक्रमी विजय प्रस्थापित केल्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या स्थापनेबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा तसेच यवतमाळ-वाशिम या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत युतीची लाट कायम राहिली. या मतदारसंघातून विजयी झालेले तिन्ही खासदार मंत्रिपदाचे दावेदार असले तरी भावना गवळीसंजय धोत्रे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा राजकीय वर्तुळात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात विदर्भातून नितीन गडकरी व हंसराज अहिर यांना संधी मिळाली होती. या निवडणुकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेले हंसराज अहिर यांचा पराभव झाला आहे. या पृष्ठभूमीवर आता मंत्रिमंडळातील प्रवेशासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांमध्ये पश्चिम विदर्भाला संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी या पाचव्यांदा विजयी झाल्या आहेत. पश्चिम वºहाडात सर्वाधिक वेळा सलग विजयी होणाऱ्या खासदार म्हणून त्यांचा विक्रम आहे, तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सलग चौथा विजय मिळून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या दोन्ही खासदारांची सांसदीय कारकीर्द लक्षात घेता त्यांचा मंत्रिपदासाठी प्रबळ दावा आहे.माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ हेसुद्धा पराभूत झाल्याने शिवसेनेकडे भावना गवळी यांच्या नावाचा सक्षम पर्याय आहे. ज्येष्ठ सदस्यासह महिला खासदार म्हणून त्यांना प्रतिनिधित्व मिळाल्यास पश्चिम विदर्भात सेनेची ताकद वाढण्यास मदतच होणार आहे.संजय धोत्रे यांना निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून या पदाला राज्य शासनाच्या ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे; मात्र धोत्रे यांचा अनुभव अन् दीर्घ सांसदीय कारकीर्द पाहता त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्यक्ष समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या नेतृत्वात अकोल्यातील जिल्हा परिषद वगळली तर सर्व सत्ता केंद्र भाजपाने जिंकली असल्याने धोत्रे यांचा दावा प्रबळ असून, त्यांचे मंत्रिपद अमरावती विभागामध्ये भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रेBhavna Gavliभावना गवळीakola-pcअकोलाyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम