शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्डची विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: August 23, 2016 23:48 IST

खामगावातील प्रकार; किरकोळ व्रिकेता न नेमता, त्यांच्या नावाचा केला वापर.

खामगाव (जि. बुलडाणा), दि. २३ : दुकानाचा बनावट शिक्का, खोटी सही व बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्ड विक्री केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी सुमित जगदीश खेतान (३४) यांनी दिलेल्या तक्रारीत स्थानिक जे. के एजन्सीजकडे रिलायन्स जिओ कंपनीसाठी किरकोळ विक्रेता म्हणून ४ मे २0१६ रोजी त्यांनी अर्ज दाखल केला होता; मात्र त्यांना कुठलेही नियुक्तीपत्र दिले नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले. दरम्यान, ७ मे, १0 मे व ११ मे रोजी त्यांच्या मोबाइलवर चार सीमकार्ड अँक्टिवेट केल्याचे एसएमएस आले होते. वास्तविक खेतान यांनी रिलायन्स कंपनीचे कोणतेही सीमकार्ड सुरू करण्याची प्रक्रिया केलेलीच नव्हती. याबाबत जे.के. एजन्सीजचे आशीष चौधरी, अब्दुल व राजू पांडे यांना भेटून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा शंका प्रबळ झाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. चौकशीत खेतान यांना रिलायन्स कंपनीचा किरक ोळ विक्रेता दाखवून त्यांच्या नावाचे बनावट रबरी शिक्के तयार करून तसेच खोट्या सह्या करून परस्पर चार सीम कार्डची विक्री केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आशीष चौधरी, अब्दुल, राजू पांडे व जे.के. एजन्सीचे अधिकारी व कर्मचार्‍यांविरुद्ध कलम ४६५, ४६८, ४७१, ४२0, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.डी. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.सीमकार्डधारक जळगाव व नाशिक जिल्हय़ातील बनावट दुकानाचा शिक्का, खोट्या सहय़ा व बनावट दस्तावेजाचा वापर करून चार सीमकार्डची विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे ही विक्री खामगावातून झाली असताना हे सीमकार्डधारक जळगाव व नाशिक जिल्हय़ातील असल्याचे उघडकीस आले आहे.