शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘लेबर बजेट’च्या माहिती संकलनासाठी धावपळ

By admin | Updated: August 24, 2016 00:15 IST

पश्‍चिम व-हाडात लेबर बजेटच्या माहिती संकलनात तहकूब ग्रामसभांचा अडथळा होत असल्याची परिस्थिती आहे.

संतोष वानखडेवाशिम, दि. २३ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ कामांसंदर्भात ह्यलेबर बजेटह्णला किती ग्रामसभांनी मान्यता दिली, याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी रोजगार हमी योजना कक्ष व जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाची धावपळ सुरू आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील काही ग्रामसभा स्थगित झाल्याने ह्यलेबर बजेटह्णची परिपूर्ण माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याची परिस्थिती अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ात आहे.राज्यातील मंजूर व बेरोजगारांना रोजगारांची शाश्‍वत हमी मिळावी या दृष्टिकोनातून १९७७ मध्ये राज्यात रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली. २00५ पासून केंद्र सरकार ही योजना देशपातळीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने राबवित आहे. या योजनेत ११ कलमी कार्यक्रमाचा समावेश केला. यानुसार सिंचन विहिरी, शेततळे, व्हर्मी कंपोस्टिंग, नाडेप कंपोस्टिंग, फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे, जलसंधारणासह इतर कामे घ्यावी लागणार आहेत. या कामांचा आराखडा तयार करणे तसेच या कामांसाठी किती मजूर उपलब्ध होऊ शकतील, याबाबतचे ह्यलेबर बजेटह्ण तयार करण्याचे निर्देशही शासनाने दिले होते.२0१७-१८ च्या कामांचा आराखडा व ह्यलेबर बजेटह्ण १५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत सादर करून मंजुरी घेण्याचे बंधन ग्रामपंचायतींवर टाकले होते. त्यानुसार, वाशिम जिल्हय़ातील ४९१, अकोला जिल्हय़ातील ५४६ आणि बुलडाणा जिल्हय़ातील ८६९ अशा एकूण १९0६ ग्रामपंचायतींनी ११ कलमी कामांचा आराखडा व लेबर बजेट जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग व रोजगार हमी योजना कक्षाकडे सादर करणे आवश्यक आहे. आठ दिवसांच्या कालावधीनंतरही किती ग्रामसभा तहकूब झाल्या, किती ग्रामसभांनी कामांचा आराखडा आणि लेबर बजेटला मंजुरी दिली, याचा लेखाजोखा पंचायत विभाग व रोजगार हमी योजना कक्षाकडे प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे. तहकूब ग्रामसभा पुन्हा घेतल्यानंतर सर्व माहिती संकलित होणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. कामांचा आराखडा आणि लेबर बजेट शासनाकडे सादर करावयाचे असल्याचे १५ ऑगस्टच्या ग्रामसभांचा लेखाजोखा तातडीने सादर करण्याच्या सूचना गटविकास अधिकार्‍यांना दिलेल्या आहेत. त्यानुसार येत्या आठवड्यात हा सर्व लेखाजोखा प्राप्त होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.