शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकाताना आरटीओ एजंट गजाआड

By admin | Updated: October 31, 2014 01:29 IST

अकोला येथील आरटीओ कार्यालय परिसरातील एक एजंट लाच स्विकारताना अटक.

अकोला: शिकाऊ परवान्यासाठी ३00 रुपयांची लाच स्वीकारताना आरटीओ कार्यालय परिसरातील एका एजंटला गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे बुधवारी यासंदर्भात तक्रार केली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात सापळा रचला. तक्रारदाराने वाहनाचा शिकाऊ परवाना बनविण्यासाठी एजंट रमेश मारोती बोळे याला ३00 रुपयांची लाच देताच, एसीबीच्या अधिकार्‍यांनी त्याला रंगेहात पकडले आणि एसीबी कार्यालयामध्ये आणले. याठिकाणी त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने तक्रारदाराकडून घेतलेल्या ३00 रुपयांचे वाटप कसे-कसे होते याची माहिती एसीबीला दिली. त्याने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मडके यांचे नाव घेतले असून, पोलिसांनी या एजंटकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित कागदपत्रेसुद्धा जप्त केली आहेत. एसीबीने या एजंटवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ८ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.