शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जनसुविधा योजनेअंतर्गत ४६ लाख रुपये निधी गेला परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST

पातूर : जनसुविधा योजनेअंतर्गत तालुक्याला ४६ लक्ष रुपयांचा निधी मिळाला होता; मात्र हा निधी अखर्चित राहिल्याने ४६ लाख रुपये ...

पातूर : जनसुविधा योजनेअंतर्गत तालुक्याला ४६ लक्ष रुपयांचा निधी मिळाला होता; मात्र हा निधी अखर्चित राहिल्याने ४६ लाख रुपये निधी परत गेला आहे. या मुद्यावरून प्रश्न उपस्थित केल्याने पंचायत समितीची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. पंचायत समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सभापती लक्ष्मीबाई जनार्धन डाखोरे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले बचत भवनात पार पडली.

सभेला सभापती लक्ष्मीबाई जनार्धन डाखोरे, पंचायत समाज समिती सदस्य निमा अनिल राठोड, गोपाल ढोरे, ॲड. सूरज झडपे, नंदू सोळंके, अनिल इंगळे, श्याम ठाकरे यांची उपस्थिती होती. सभेचे कामकाज गटविकास अधिकारी राहुल शेळके यांनी पाहिले. या वेळी सर्व विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते. आभार प्रदर्शन कृषी विस्तार अधिकारी अंकुश ठाकरे यांनी मानले.

------------

सर्वसाधारण सभेत या विषयांवर झाली चर्चा

सभेत मागील महिन्याची इतिवृत्त कायम करणे, ऑगस्ट २०२१ चा जमा खर्च मंजुरी देणे, पंचायत समिती सेस फंडातील प्लास्टिक ताडपत्री योजनेसाठी लाभार्थी निवड करणे, शिक्षण विभागांतर्गत शाळेसाठी वर्षभरात सुट्ट्यांबाबत कार्य वृत्तांत मंजुरी देण्यात आली. कृषी विभागांतर्गत योजनेअंतर्गत लाभार्थीची निवड व विविध योजनेंसंदर्भात चर्चा करण्यात आली. पशुसंवर्धन विभागांतर्गत योजनेतील निवड झालेले लाभार्थी व किती लाभार्थींना लाभ दिला, यांवर चर्चा करण्यात आली. घरकुल योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत विहीर पुनर्भरण, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत तसेच ग्रामीण भागातील बस, पाणंद रस्ते, ग्रामीण रुग्णालय आदींबाबत चर्चा करण्यात आली.

-------------------

जनसुविधेंतर्गत तालुक्यातील एकूण ४६ लाख रुपये निधी परत गेला आहे. त्यामुळे तालुक्यात आलेला विकास निधी खर्च न झाल्यामुळे तालुक्याचा विकास रखडला असून, शासनाने तो निधी तातडीने परत करावा.

निमाताई अनिल राठोड, पंचायत समिती, पातूर

----------------

निधी मार्च महिन्यात प्राप्त झाला होता. त्यानुसार ग्रामपंचायतीला काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते; मात्र ग्रामपंचायतीने कामे सुरू केली नाहीत. त्यामुळे ३१ मार्च २०२१ रोजी अखेरचा निधी वरिष्ठ कार्यालयाकडून खर्च न झाल्यामुळे परत मागविण्यात आला.

-व्ही. जे. शिंदे, शाखा अभियंता, पातूर