शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी सामंजस्याची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:55 IST

अकोला : अकोला महानगर व जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्ताने  गेल्या दोन दिवसांपासून स्वराज्य भवन येथे बैठकांचे सत्र सुरू आहे. मंगळवारी महानगर अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याबाबतचा ठराव पदाधिकार्‍यांनी घेतला होता. बुधवारी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी झालेल्या बैठकीत मात्र केवळ निवडणुकीचा ठराव घेण्याऐवजी सामंजस्याची भूमिका समोर आली आहे. जिल्हाध्यक्ष पदाची निवड ही निवडणुकीने घ्यावी, पक्षo्रेष्ठींनी थेट निवड करून अध्यक्ष द्यावा, असे पर्याय बैठकीत समोर ठेवण्यात आले, तर काही पदाधिकार्‍यांनी ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याबाबतही भूमिका मांडली.

ठळक मुद्देहिदायत पटेल, प्रकाश तायडे शर्यतीत निवडीबाबतच्या पर्यायांचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला महानगर व जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्ताने  गेल्या दोन दिवसांपासून स्वराज्य भवन येथे बैठकांचे सत्र सुरू आहे. मंगळवारी महानगर अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याबाबतचा ठराव पदाधिकार्‍यांनी घेतला होता. बुधवारी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी झालेल्या बैठकीत मात्र केवळ निवडणुकीचा ठराव घेण्याऐवजी सामंजस्याची भूमिका समोर आली आहे. जिल्हाध्यक्ष पदाची निवड ही निवडणुकीने घ्यावी, पक्षo्रेष्ठींनी थेट निवड करून अध्यक्ष द्यावा, असे पर्याय बैठकीत समोर ठेवण्यात आले, तर काही पदाधिकार्‍यांनी ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याबाबतही भूमिका मांडली.स्थानिक स्वराज्य भवन येथे बुधवारी सकाळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आमदार राजेशकुमार यांनी पदाधिकार्‍यांची मते जाणून घेतली. यावेळी  जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, प्रदेश महासचिव मदन भरगड, माजी मंत्री डॉ. अजहर हुसेन, नातिकोद्दिन खतीब, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी,  माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव विखे पाटील, महासचिव राजेश भारती, महासचिव प्रकाश तायडे, रमाकांत खेतान, माजी मंत्री रामदास बोडखे, स्वाती देशमुख, मूर्तिजापूर माजी तालुकाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्‍वर ढेरे, अन्वर खान, कपिल रावदेव, आकाश कवडे, हेमंत देशमुख आदी उपस्थित होते.

अहवाल देणार काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रकाश तायडे हे जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. त्यांच्या सर्मथनार्थ अनेक पदाधिकार्‍यांनी आपले मत निवडणूक अधिकारी आ. राजेशकुमार यांच्याकडे व्यक्त केले, तर हिदायत पटेल यांनीही जिल्हा काँग्रेस उत्तम सांभाळली असून, त्यांना पुन्हा संधी मिळाली तरी हरकत नाही, असेही पटेल यांच्या सर्मथकांनी निवडणूक निरीक्षकांसमोर  सांगितले. बैठकीत व्यक्त झालेल्या भूमिकांबाबत आ. राजेशकुमार हे पक्षo्रेष्ठींकडे अहवाल देणार असून, या बैठकीचे झालेले चित्रीकरणही वरिष्ठांपर्यंत पोहचविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

गटबाजी टाळण्याचे आवाहन बिहारचे आमदार राजेशकुमार यांनी स्थानिक  पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षातील गटबाजी टाळण्याचे आवाहन केले. भाजपाने राष्ट्रपतीच्या निवडणुकीलाही जातीय रंग देत राजकारणाचा स्तर गमावला असल्याचा आरोप करीत, आ. राजेशकुमार यांनी काँग्रेस पदाधिकार्‍यांना सक्रिय होत लोकांचे प्रश्न लावून धरण्याचे आवाहन केले. काँग्रेस ही विचारधार आहे. या पक्षामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. खर्‍या कार्यकर्त्याला न्याय मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

कार्यकर्ते कुणाचे? जिल्हा निवडणूक अधिकारी आ. राजेशकुमार यांनी  पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी गटा-गटाने  बंदद्वार चर्चा केली. यावेळी काही नेत्यांसोबत आलेले कार्यकर्ते हे खरे कार्यकर्ते नाहीत, असा आक्षेप काहींनी घेतल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, सामंजस्याची भूमिका कायम ठेवत वाद निवळण्यात आला. -