बाळापूर (जि. अकोला ): सराफा व्यावसायिक असलेल्या बाप-लेकांना तीन युवकांनी लुटल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कान्हेरी फाटा ते अंबुजा फॅक्ट्रीदरम्यान घडली. लुटारूंनी बाप-लेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. सराफा व्यावसायिक सुरजसिंह ठाकूर यांचे बाळापूर येथे दुकान आहे. ते अकोला येथे राहतात. ते गुरुवारी रात्री मुलगा सतीशसह बॅगमध्ये रोख रक्कम आणि दागिने घेऊन दुचाकीने बाळापूरवरून अकोल्याकडे निघाले. कान्हेरी फाटा ते अंबुजा फॅक्ट्रीदरम्यान त्यांच्यावर अज्ञात तीन युवकांनी शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. लुटारूंनी ठाकूर यांच्याकडील बॅगही लंपास केली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेऊन जखमी ठाकूर बाप-लेकांना तातडीने बाळापूर येथील रुग्णालयात भरती केले.
सराफा व्यावसायिकास लुटले
By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST