शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा आढावा विधी शिबिरातही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:26 IST

अकोला : शासनाच्या विविध योजनांचा आढावा समाधान शिबिरात घेतल्यानंतर आता उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीकडूनही योजनांची आढावा, माहिती विधी सेवा शिबिरात दिली जाणार आहे. त्यासाठीची तयारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सुरू केली. येत्या सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात ही शिबिरे होणार आहेत. 

ठळक मुद्देसप्टेंबरमध्ये होणार जिल्ह्यात विधी सेवा शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या विविध योजनांचा आढावा समाधान शिबिरात घेतल्यानंतर आता उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीकडूनही योजनांची आढावा, माहिती विधी सेवा शिबिरात दिली जाणार आहे. त्यासाठीची तयारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सुरू केली. येत्या सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात ही शिबिरे होणार आहेत. लाभार्थींना योजनांचे लाभ वितरित होण्यासाठी जिल्हा विधी सेवा शिबिरात माहिती दिली जाणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी तयार केलेल्या योजना, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देणे, त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणे, यासाठी विधी सेवा शिबिरात योजनांचा आढावा घेण्याचे नागपूर उच्च न्यायालयातील विधी सेवा उप-समितीने बजावले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातही येत्या सप्टेंबरमध्ये विधी सेवा शिबिर आयोजित केली जात आहेत. त्यामध्ये शासनाच्या विविध योजना राबवणार्‍या सर्वच शासकीय विभागांकडून योजनांची संपूर्ण माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मागवली आहे. त्यासाठीची जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची पहिली बैठकही पार पडली. त्यामध्ये विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश यांनी संबंधितांना माहिती सादर करण्याचे बजावले आहे. या माहितीसोबतच जिल्ह्यातील विधी सेवा शिबिराची रूपरेषाही संबंधित अधिकार्‍यासमक्ष ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्या विविध अधिकार्‍यांना बैठकीत बोलावण्यात आले. त्यामध्ये विशेषत: सहायक आयुक्त समाजकल्याण, उपविभागीय महसूल अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्व विभाग, शिक्षणाधिकारी, कृषी विकास अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा, नरेगा सहायक गटविकास अधिकारी यांच्यासोबतच अनेक विभागप्रमुखांचा सहभाग आहे.