मूर्तिजापूर : येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी रायुकाँचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील वाकोडे होते. तर राकाँचे मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, निजामभाई इंजिनियर, गोपालराव उगले, अमृतेश अग्रवाल, नगरसेवक लखन अरोरा, रायुकाँचे माजी तालुकाध्यक्ष संदीप जळमकार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी युवकाचे मार्गदर्शन केले. तसेच युवकांनीही आपल्या समस्या मांडल्या. बैठकीचे संचालन सचिन गावंडे तर आभार प्रदर्शन अखिल भटकर यांनी केले. बैठकीला श्रीधर कांबे, सरवर बेग, अमोल सरप, महेंद्रा बोळे, अमोल शिंदे, देवा बोधडे, शुभम मोहोड, उमेश साखरे, प्रोहित वरोकार, रोशन दाभाडे, गणेश गोरले, प्रदीप फुके, चंदू सुतार, सिकंदर खान, मनीष फाटे, विक्की यादव, लकी अग्रवाल यांच्यासह रायुकाँचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायुकाँची आढावा बैठक
By admin | Updated: May 14, 2014 19:34 IST