शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

मर्जीतील सात कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

शहरात साफसफाइच्या नावाखाली वर्षाकाठी काेट्यवधी रुपयांची उधळण केली जात असली तरी अस्वच्छता कायम असल्याचे चित्र पाहावयास मिळते. नागरिकांच्या आराेग्याशी ...

शहरात साफसफाइच्या नावाखाली वर्षाकाठी काेट्यवधी रुपयांची उधळण केली जात असली तरी अस्वच्छता कायम असल्याचे चित्र पाहावयास मिळते. नागरिकांच्या आराेग्याशी निगडित असलेली ही समस्या निकाली काढण्याला प्राधान्य देत आयुक्त निमा अराेरा यांनी खर्चाला कात्री लावत नगरसेवकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले ५१ पडीक वाॅर्ड १ जूनपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे स्वच्छता व आराेग्य विभागात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत १५ आराेग्य निरीक्षक, ११ संगणक चालकांची सेवा आयुक्त अराेरा यांनी बंद केली. या दाेन्ही मुद्यावरून सत्ताधारी भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, १ जून राेजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत सात कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा ठराव प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती आहे.

राजकारण्यांची प्रतिष्ठा पणाला

आयुक्त अराेरा यांनी सेवा समाप्त केलेल्या सात कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये भाजपमधील राजकारण्यांच्या निकटवर्तीयांचा समावेश आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत समाविष्ट करण्याचा ठराव स्थायी समितीने प्रशासनाकडे सादर केला. आजवर आयुक्तांनी त्यांच्या निर्णयात काेणताही फेरबदल केल्याचे दिसून आले नाही. यासंदर्भात राजकारण्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने आयुक्तांच्या भूमिकेकडे संपूर्ण अकाेलेकरांचे लक्ष लागले आहे.

११५ नव्हे ११३ कर्मचाऱ्यांना मुदतवाढ

प्रशासनाने मानधनावरील ११५ कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव १ जून राेजीच्या स्थायी समितीच्या सभेकडे पाठवला हाेता. त्यावेळी सभागृहात काेणत्याही सबळ कारणाशिवाय मानसेवी कर्मचारी संदीप गावंडे, राजेंद्र टापरे यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला हाेता. या दाेन कर्मचाऱ्यांना वगळून स्थायी समितीने ११३ कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीचा ठराव प्रशासनाकडे सादर केला असून यामध्येच सात कंत्राटी कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्याचा उल्लेख आहे.