शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा भूसंपादनाच्या आंध्र पॅटर्नला विरोध

By admin | Updated: June 22, 2016 23:57 IST

आठपदरी महामार्ग व टाउनशीपला लागणार हजारो एकर जमीन.

विवेक चांदूरकर / बुलडाणा मुंबई ते नागपूर आठपदरी महामार्ग (सुपर एक्स्प्रेस हायवे) बुलडाणा जिल्ह्यातून जाणार असून, या महामार्गालगत टाउनशीपही उभारण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील शेकडो शेतकर्‍यांची हजारो हेक्टर जमीन आंध्र पॅटर्ननुसार संपादित करण्यात येणार आहे. याला शेतकर्‍यांनी प्रचंड विरोध दर्शविला असून, यामुळे शेतकरी भूमिहीन होणार तर होणारच तसेच त्यांना शेताचा मुबलक मोबदलाही मिळणार नाही. त्यामुळे या महामार्गाला शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. नागपूर ते मुंबई या आठपदरी महामार्गालगत टाउनशीप उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या टाउनशीपमध्ये विविध उद्योग निर्माण करण्यात येतील. महामार्ग व टाउनशीपकरिता जमीन जाणार असल्यामुळे शेतकर्‍यांनी या महामार्गाला विरोध दर्शविला आहे. विविध भागातील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देऊन विरोध व्यक्त केला आहे. या महामार्गावर दुसरबीड, वर्दळी व केशवशिवणी भागातील १ हजार एकर जमीन जाणार आहे. टाऊनशीपकरिता शेतकर्‍यांना जमिनीची मागणी करण्यात आली असून, आंध्र पॅटर्ननुसार मोबदला देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे; मात्र शेतकर्‍यांनी जमीन देण्याला विरोध दर्शविला आहे, तसेच रायरी व सिंदखेड राजा या भागात शासनाची एक हजार एकर ई - क्लासची जमीन आहे. त्या ठिकाणी सदर टाउनशीप हलविण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकर्‍यांची जमीन मक्याने घेऊन त्यांना प्रती एकरी त्यांचीच १0 गुंठे जमीन दिल्या जाणार आहे. यामध्ये शेतकर्‍यांना उद्योग करावा लागणार आहे; मात्र वर्षानुवर्षांंपासून शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी या ठिकाणी कोणता व्यवसाय करावा, असा प्रश्न उपस्थित केला आहे.