शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांचा अहवाल अपूर्ण

By admin | Updated: March 12, 2015 01:43 IST

अहवाल नव्याने सादर करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

अकोला: महापालिका प्रशासनाने तयार केलेला ७८२ धार्मिक स्थळांचा अहवाल अपूर्ण असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आयोजित केलेल्या बैठकीत समोर आले. झोननिहाय तयार करण्यात आलेल्या अहवालावर संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी पाहणी केल्याचा शेरा नमूद नसल्याने मनपाच्या चारही झोन अधिकार्‍यांना अपूर्ण अहवाल बुधवारी परत करण्यात आले. यानिमित्ताने मनपासह पोलीस प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.मनपा क्षेत्रात उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांचा सर्व्हे करून अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर करणे महापालिका प्रशासनाला बंधनकारक होते. त्यानुषंगाने शहरातील खासगी जागा वगळता शासकीय जमीन, मुख्य रस्ते तसेच सार्वजनिक जागेवर उभारण्यात आलेल्या ७८२ धार्मिक स्थळांचा अहवाल मनपाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. यामध्ये मंदिर, मशीद, बुद्ध विहार, दर्गा, चर्च आदींचा समावेश आहे. धार्मिक स्थळांच्या मुद्यावर अंतिम निर्णय जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीला घ्यावा लागेल. या विषयावर जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी प्रथमच मनपा अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन केले. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मनपा उपायुक्त माधुरी मडावी, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, कैलास पुंडे, राजेंद्र घनबहाद्दूर, वासुदेव वाघाडकर उपस्थित होते. मनपाने सादर केलेला अहवाल अपूर्ण असल्याचे यावेळी समोर आले. झोननिहाय धार्मिक स्थळांचे निरीक्षण करून तसा शेरा नमूद करणे पोलीस प्रशासनालादेखील बंधनकारक होते. अहवालावर कोणताही शेरा नसल्याने वाहतुकीला अडथळा ठरणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणार्‍या धार्मिक स्थळांबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यामुळे झोननिहाय धार्मिक स्थळांच्या अहवालावर संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी पाहणी करून तसा शेरा नमूद करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.