शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही शेतसारा वसुली!

By admin | Updated: December 6, 2015 02:28 IST

अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना सवलती केव्हा मिळणार?

अकोला: जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी सरासरी ४२ पैसे जिल्हा प्रशासनमार्फत जाहीर करण्यात आली. पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी, शासनामार्फत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी सवलती अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही जिल्ह्यात शेतकर्‍यांकडून शेतसार्‍याची वसुली करण्यात येत आहे. या पृष्ठभूमीवर दुष्काळी दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीत दिल्या जाणार्‍या सवलती केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर्षी पावसाळय़ात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीपाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, कपाशीचे उत्पादनही एकरी चार क्विंटलच्यावर पोहोचले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. यावर्षीच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील सातही तालुक्यातल्या लागवडी योग्य ९९७ गावांमधील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी ७ नोव्हेंबर रोजी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ९९७ गावांची खरीप पिकांची सरासरी पैसेवारी ४२ पैसे म्हणजेच ५0 पैशांपेक्षा कमी आहे. खरीप पिकांच्या पैसेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले; मात्र शासनामार्फत अद्यापही जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला नसून, दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना द्यावयाच्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून शेतसारा वसूल करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनामार्फत दिल्या जाणार्‍या जमीन महसुलात सूट व इतर सवलतींचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्‍यांना केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.