शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

मान्यता एका गावात; शाळा भरते दुस-या गावात!

By admin | Updated: November 23, 2015 01:10 IST

वाशिम जिल्ह्यातील प्रकार,शिक्षण विभागातील सावळागोंधळ उघड.

संतोष वानखडे / वाशिम : स्थलांतरणाचा नियम धाब्यावर बसवून, वाशिम तालुक्यातील एका शिक्षण संस्थेने धुमका येथे मान्यता असलेली खासगी माध्यमिक शाळा चक्क बोराळा शिवारात थाटली असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद सदस्याच्या तक्रारीने समोर आणला आहे. या प्रकाराने शिक्षण विभागातील सावळागोंधळ चव्हाट्यावर आणला असून, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या विषयात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.माध्यमिक शिक्षण विभागातील कथित शिक्षक व लिपिक पदभरतीच्या गैरप्रकाराची शाई वाळते न वाळते तोच जिल्ह्यातील काही शाळा स्थलांतरणाचा नियम डावलून दुसर्‍या ठिकाणी सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. कथित पदभरतीने वाशिम येथील दोन तत्कालीन शिक्षणाधिकार्‍यांना फौजदारी कारवाई व निलंबनाच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. आता काही शाळांची मान्यता एका ठिकाणी आणि त्या दुसर्‍या ठिकाणी भरत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत.वाशिम येथील श्री संत पांडुरंग महाराज शिक्षण प्रसारक संस्था अंतर्गत स्व. नामदेवराव राजगुरू विद्यालय १९९९ पासून सुरू आहे. या विद्यालयाची मान्यता धुमका येथे आहे. नियमानुसार मान्यता असलेल्या ठिकाणी शाळा सुरू ठेवणे गरजेचे आहे. एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी शाळा स्थलांतरित करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागते. शिक्षण विभागाची परवानगी न घेता स्व. नामदेवराव राजगुरू विद्यालय धुमक्याऐवजी बोराळा शिवारात सुरू आहे. हा प्रकार सन २000 पासून सुरू असतानाही शिक्षण विभागाचे याकडे लक्ष जाऊ नये, ही गंभीर बाब असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य सचिन रोकडे यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या सभेत या प्रकाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी या प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षण विभागाला दिले आहेत. शिक्षण विभाग काय अहवाल सादर करतो, यावर या शाळेचे भवितव्य अवलंबून आहे.