शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन आता ऑनलाइन!

By admin | Updated: December 12, 2015 02:42 IST

अमरावती विद्यापीठात हिवाळी-२0१५ परीक्षेपासून प्रक्रिया सुरू.

प्रवीण खेते/अकोला : परीक्षेचे पुनर्मूल्यांकन किंवा उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना हेलपाटे घ्यावे लागत असल्याने अमरावती विद्यापीठाने ही प्रक्रिया आता ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेला हिवाळी-२0१५ परीक्षेपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुनर्मूल्यांकन किंवा उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत मिळविण्यासाठी विभागातील विद्यार्थ्यांना वारंवार अमरावतीला जाण्याची गरज राहणार नाही. परीक्षेच्या निकालानंतर अमरावती विभागातील विद्यार्थ्यांना परीक्षेचे पुनर्मूल्यांकन किंवा उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत मिळविण्यासाठी हेलपाटे घ्यावे लागतात. विद्यार्थ्यांची होणारी धावपळ पाहता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामार्फत परीक्षेचे पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत मिळण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेला विद्यापीठाच्या हिवाळी-२0१५ परीक्षेपासून सुरुवात करण्यात आली आहे. विद्यापीठातर्फे यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे पुनर्मूल्यांकन तसेच उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत मिळवायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असून, त्यामध्ये भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल अँड्रेस अचूक समाविष्ट करावा, विद्यार्थ्यांनी लॉग-इन करून संबंधित आवेदनपत्र निवडावे. यानंतर त्यासाठी लागणार्‍या शुल्काबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. विद्यार्थ्यांनी कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेच्या धनाकर्षाद्वारे (डी.डी.) किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत ह्यपॉवर ज्योतीह्ण खाते क्रमांकामध्ये प्रत्यक्ष चालानद्वारे शुल्क भरावे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने आवेदन भरल्यानंतर विद्यार्थ्यांंनी सदर पत्रासोबत अर्जासाठी छापील पत्र, मूळ गुणपत्रिका व शुल्क भरणा केल्याच्या मूळ पावतीसह विद्यापीठात प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे पाठविणे आवश्यक राहणार आहे.