शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या तांदळाचा साठा जप्त

By admin | Updated: October 17, 2016 02:52 IST

गोदामामध्ये आढळल्या ३८६ गोण्या; दोन दिवसांपूर्वी केले होते गोदाम सील.

लोहारा, दि. १६- लोहारा गावातील एका गोदामामध्ये लपविलेला ३८६ कट्टे रेशनचा तांदूळ साठा पुरवठा विभागाने धाड टाकून रविवारी जप्त केला. या तांदूळाची किंमत २ लाख ८६ हजार रुपये एवढी आहे. लोहारा गावाजवळील डोंगरगाव रोडवर एका शेतातील मोठय़ा गोदामामध्ये शुक्रवारी रेशनचा साठा उतरवित असल्याची गुप्त माहिती जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली होती. त्यानुसार सायंकाळी पथकाने गोदामावर धाड टाकली; मात्र पथक गोदामवर पोहोचण्यापूर्वीच ट्रक साठा खाली करून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे अधिकार्‍यांनी गोदाम मालक सुशीलसिंह अनिरुद्धसिंह ठाकूर यांना बोलावल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत न पोहोचल्याने गोदाम सील केले. त्यानंतर रविवारी सकाळी ८ वाजता जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांच्यासह बाळापूरचे निरिक्षण अधिकारी सुरेश किर्दक यांच्या पथकाने गोदाम उघडले. यामध्ये असलेला ३८६ कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला. या गोदामात अकोला जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील काही गावांमधील रेशनचा तांदूळ आणि गहू नेहमी जमा केला जातो. त्या धान्याचा काळाबाजार करण्यासाठी मध्य प्रदेशात पाठविला जातो, अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांसह किर्दक, एम.बी. देशमुख, विनोद वानखडे, दामोदर यांनी ही कारवाई केली. सकाळपासून दुपारपर्यंंत गोदाम परिसरात पत्रकारांना जाण्यावर बंदी होती. बंदद्वार झालेल्या या कारवाईबाबत गावात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.