शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राठोड आणि हुसेन यांची आज पेशी

By admin | Updated: December 11, 2014 01:01 IST

महिला अधिका-याचा छळ करणे भोवले.

अकोला : हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.एम.एम. राठोड आणि एकाच ठिकाणी ३0 वर्षांपासून कार्यरत असलेला कर्मचारी नासीर हुसेन यांची गुरुवारी विशाखा समितीसमोर पेशी असून, त्यांची सहा सदस्यीय समितीकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सहाय्यक संचालक हिवताप विभागात गत ३0 वर्षांपासून कार्यरत असलेला नासीर हुसेन नामक कर्मचारी आणि सहाय्यक संचालक डॉ.एम. एम. राठोड यांनी लोकसेवा आयोगामार्फत लागलेल्या एका महिला अधिकार्‍याचा छळ सुरू केला होता. या महिला अधिकार्‍यांशी असभ्य भाषेत बोलणे, त्यांना साहेबांची मर्जी राखण्यास प्रेरित करण्यासाठी दबाव आणण्याचा पुरेपूर प्रयत्न नासीर हुसेन या कर्मचार्‍याने सुरू केला होता. मात्र, या प्रकरणी या महिला अधिकार्‍यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आणि हा प्रकार ह्यलोकमतह्णने उजेडात आणताच या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. डॉ. अविनाश लव्हाळे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, गुरुवारी विशाखा समितीसमोर डॉ. एम. एम. राठोड व नासीर हुसेन यांची चौकशी होणार आहे. मानवी हक्क आयोगाच्या महिला अधिकारी, आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे, आरोग्य उपसंचालक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी करुणा सुरवाडे व आणखी एक महिला अधिकारी, वैद्यकीय विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.पी.एल. माने यांच्याकडून ही चौकशी करण्यात येणार आहे. नासीर हुसेन या कर्मचार्‍याने या आधी वृंदन राठोड असतांनाही महिला अधिकारी व कर्मचार्‍यांचा छळ सुरू केला होता. त्यामुळे हैरान झालेल्या महिला कर्मचार्‍यांनी या प्रकरणाची तक्रारही केली, मात्र त्यावेळी गंभीर दखल घेण्यात आली नाही. आता सदर प्रकरण ह्यलोकमतह्णने उजेडात आणताच आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.