शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पत्रकाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा!

By admin | Updated: April 13, 2017 02:04 IST

अकोला- १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या बोगस पत्रकाराविरुद्ध रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला : आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर असलेल्या मलेरिया विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावणे तसेच १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या बोगस पत्रकाराविरुद्ध रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशफाक पटेल असे या बोगस पत्रकाराचे नाव आहे.मलेरिया विभागाचे अधिकारी डॉ. राठोड हे ३ एप्रिल रोजी कामात व्यस्त असताना बोगस पत्रकार अशफाक पटेल त्यांच्या कार्यालयात आला. त्याने कार्यालयातील माहिती विचारून डॉ. राठोड यांची बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामी टाळायची असेल, तर आताच १० हजार रुपये देण्याची मागणी केली. मात्र, राठोड यांनी सदर बोगस पत्रकाराची माहिती घेतली असता तो पत्रकार नसल्याचे समोर आले. या प्रकरणाची तक्रार डॉ. राठोड यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर पोलिसांनी बोगस पत्रकार अशफाक पटेल याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अशफाक पटेल याच्याविरुद्ध यापूर्वीही खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.बोगस पत्रकारांचा सुळसुळाट!शहरासह जिल्ह्यात सध्या बोगस पत्रकारांचा प्रचंड सुळसुळाट आहे. व्हॉट्स अ‍ॅपवर ग्रुप तयार करून त्यामध्ये पोलीस अधिकारी आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करणे व या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे व यामधूनच पैशाची मागणी करणारे पत्रकार प्रचंड निर्माण झाले आहेत. काही पत्रकार पोलीस कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर त्यांची बदनामी होईल, अशाप्रकारचे मॅसेज टाकतात आणि त्यानंतर सदर कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी करीत असल्याचेही पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.