शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी घरकूल योजना नव्या स्वरुपात

By admin | Updated: August 23, 2014 22:10 IST

योजनेत क वर्ग नगरपरिषदांचा समावेश

खामगाव: राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांकरिता राबविण्यात येणार्‍या राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना आता राजीव गांधी घरकुल योजना म्हणून ओळखली जाणार आहे. या योजनेत क वर्ग नगरपरिषदांचा समावेश करण्यात आला असून प्रति घरकुल अनुदानात वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २२ ऑगस्ट रोजी घेतला आहे. शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आदिवासी घरकूल योजना या योजनेतील लाभार्थ्यांना या आधी शासनाने प्रति घरकुल अनुदानात वाढ करुन या योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. याच पृष्ठभूमिवर राजीव गांधी घरकुल योजने अंतर्गत घरकुलाचे अनुदान ७0 हजारावरुन एक लाख करण्यात आले आहे. यामध्ये राज्य शासनाचे अनुदान ९५ हजार असून लाभार्थ्यांचा हिस्सा ५ हजार रुपये असणार आहे. या योजनेसाठी २0१४-१५ या वर्षासाठी १00 कोटी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेमध्ये ८0 कोटी रुपये ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील सर्व प्रवर्गातील कु टुंबासाठी राखीव राहणार आहे.तर नव्यानेच समावेश करण्यात आलेल्या क वर्ग नगरपरिषदांसाठी २0 कोटी सुरुवातीचा निधी म्हणून देण्यात येणार आहे. यामध्ये क वर्गात येणार्‍या राज्यातील सर्व नगरपरिषद क्षेत्रात जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत योजना राबविण्यात येणार आहे. नगरपरिषद क्षेत्रातील घरकुलाची किंमत १ लाख ५0 असणार आहे. यामध्ये राज्यशासनाचे अनुदान १ लाख ३८ हजार ७५0 रुपये तर लाभार्थ्यांचा हिस्सा ११ हजार २५0 रूपये असणार आहे. या निधीचे वाटप म्हाडामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय व त्यानंतर नगरपरिषदांना होणार आहे. ** स्थलांतर करणार्‍या नागरिकांनाही लाभशासनाने या पूर्वी वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामीण क्षेत्राचा नव्याने नागरी क्षेत्रात समावेश करुन तो भाग क वर्ग नगरपरिषद क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. तसेच या योजनेमध्ये ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधासाठी दारिद्रयरेषेखालील कुटुंबे तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरीत झाली असती तरी यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.** उपलब्ध निधी सर्व प्रवर्गासाठी ३७३.४२ कोटी व अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता १0६. ८0 कोटी असा एकूण निधी ४८0.२२ कोटी उपलब्ध आहे. या योजनेतून प्रति घरकुलासाठी ९५ हजार याप्रमाणे राज्यात एकूण ५0 हजार ५५0 घरांचे उदिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.