शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे दिवस झाले कमी!

By admin | Updated: June 24, 2016 23:41 IST

२0 जूनला एका दिवसात पडला ३९ मि.मी.पाऊस!

राजरत्न सिरसाट/अकोलापावसाचे स्वरू प बदलले असून, संपूर्ण पावसाळ्य़ातील अर्धा पाऊस केवळ १५ तासांत अतिवेगाने कोसळत असल्याचा अभ्यास कृषी संशोधकांनी केला आहे. ५५ ते ६0 दिवस पडणारा पाऊस मागील दशकात ३0 ते ३५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी २0 जून रोजी २.४५ तासांत ३९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यातील ३0 मि.मी. पाऊस अवघ्या ४५ मिनिटांत पडला. या संदर्भातील अभ्यास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पाणलोट क्षेत्रावर करण्यात आला आहे. राज्यात यावर्षी जवळपास हेच चित्र असल्याने कमी कालावधीच्या पिकांवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पाणलोट क्षेत्रावर पडणार्‍या पावसाचे सूक्ष्म निरीक्षण करण्यात येत असून, यावर्षी मे महिन्याच्या ७ तारखेला २१ मि.मी. पावसाची नोंद येथे करण्यात आली. हा पाऊस चार ते सहा तासांत पडला असून, त्याचे प्रमाण हे ३ ते ५ मि.मी. प्रतितास होते. ७ जूनला ७.५ मि.मी. पाऊस झाला. ९ जून रोजी ३.५ मि.मी., तर २0 जून रोजी ३९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २२ जून रोजी ५ मि.मी. पाऊस १ तास ४९ मिनिटांत पडला. म्हणजेच या दिवशीचा पावसाचा वेग हा प्रतितास २.७५ मि.मी. एवढा होता.मागील वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ६२२. ३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, जून महिन्यातील सात दिवसांत ८९.२ मि.मी. पाऊस झाला. जुलैमध्ये चार दिवसांत ६३.५0 मि.मी., तर ऑगस्ट महिन्यातील आठ दिवसांत सर्वाधिक ३१३.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यातील पाच दिवसांत १५६.४ मि.मी., तर ऑगस्टमध्ये ५ तारखेला एकाच दिवशी १९४ मि.मी. पाऊस पडला. संपूर्ण पावसाळ्य़ातील ३२ टक्के हा पाऊस होता. जून महिन्यातील ८९.२ मि.मी. पावसापैकी ४४.९0 मि.मी. पाऊस 0.ते १0 मि.मी. प्रतितास वेगाने २0 तास ३९ मिनिटांत पडल्याची नोंद आहे. जुलैमधील ६३.५0 मि.मी. पैकी ३0.२0 मि.मी. पाऊस 0.ते १0 मि.मी. प्रतितास या वेगाने ४६ तासांत पडला. सप्टेंबर महिन्यातील १५६.४ मि.मी.पैकी ७0.४0 मि.मी. म्हणजे अर्धा पाऊस 0.ते १0 मि.मी. प्रतितास वेगाने १९.४0 मिनिटांत पडला. याच अभ्यासावरू न कृषिशास्त्रज्ञांनी मागील १८ वर्षांतील पडणार्‍या पावसाचे निष्कर्ष काढले असून, यावरू न पडणार्‍याचे पावसाचे दिवस कमी झाल्याचे समोर आले आहे.