शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात तिस-या दिवशीही पाऊस

By admin | Updated: March 12, 2015 01:48 IST

आलेगाव परिसरात गारपीट; मूर्तिजापूर, बाळापूर तालुक्यात पावसाच्या सरी

अकोला: जिल्ह्यात बुधवारी पहाटे पुन्हा पाऊस झाला. मूर्तिजापूर, पातूर शहर आणि बाळापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. अकोला शहरातसुद्धा रात्री ७.४५ वाजतानंतर वादळी वार्‍यासह पाऊस कोसळला.मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी तालुक्यात सोमवारी आणि मंगळवारी अवकाळी पाऊस झाला होता. मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम, मधापुरी, माटोडा, नवसाळ, रामटेक, जामठी, मंडुरा, वडगाव, कार्ली, बोरगाव निंघोट, अकोली जहॉंगीर, धामोरी, कवठा, खिनखिनी व राजुरा घाटे या गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. काही ठिकाणी लिंबाच्या आकाराच्या गाराही पडल्या होत्या. बुधवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. मूर्तिजापूर आणि पातूर शहरात सकाळी ११ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. पातूर येथे जोरदार हवाही सुटली होती. त्यामुळे काहीवेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी परिसरात सकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मूर्तिजापूर, पातूर आणि बाळापूर तालुक्यात बुधवारी अल्प पाऊस झाला असला, तरी शेतकरी धास्तावले आहेत. शेतात गहू व हरभरा पीक असून, काहींच्या फळबागाही आहेत. कधीही अवकाळी पाऊस कोसळू शकतो, असे वातावरण आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी गहू आणि हरभरा पीक काढण्यास सुरुवात केली आहे.