शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आलेगाव येथे पावसाचा तडाखा

By admin | Updated: June 11, 2017 02:34 IST

शेती खरवडून गेली: २५ मेंढय़ांचा मृत्यू; वीज पडून म्हैस ठार

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव : परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या तुफान पावसाचा तडाखा बसला. ढगफुटीसारख्या झालेल्या या पावसामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जांब येथे शेती खरवडून गेली, तर शेतात असलेल्या २५ मेंढय़ा व काही कोंबड्यांचा मृत्यू झाला. पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक शेतकर्‍यांनी टाकलेले बांध फुटले. दरम्यान लसनापूर येथे वीज पडून म्हैस ठार झाल्याची घटना घडली आहे.या वर्षी पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. या वर्षी वेळेवर वरुणराजाचे आगमन होईल, या आशेने शेतकर्‍यांनी मेहनत करून शेताची मशागत केली; परंतु मान्सूनपूर्व पावसाने ढगफुटीसारखा पाऊस दोन तास पडल्याने नदी-नाले एकत्र झाले व मोठा पूर आला. यापूर्वी २00६ साली असा पूर आला होता. या पावसाने चोंढी शिवार, जांबमध्ये आणि आलेगाव परिसरात खूप मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. त्यामध्ये मोठ-मोठे बांध टाकलेले वाहून गेले, शेतामध्ये असलेल्या शेंगांचे ढीग वाहून गेले, कांदा साठविल्या ठिकाणीसुद्धा पाणीच पाणी झाले. तसेच काही शेतकर्‍यांनी शेतात मेंढय़ा व कोंबड्या बसवलेल्या आहेत. जोरदार पावसामुळे २५ मेंढय़ा व काही कोंबड्यांचा मृत्यू झाला. कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यातच या पावसामुळे कांदा पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तसेच गावाला लागून असलेल्या लेंडी नाला अरुंद झाल्यामुळे पाणी लोकांच्या घरात शिरल्याने त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. बस स्थानकावर असलेल्या जैन कृषी सेवा केंद्रात पाणी शिरल्याने खते, बियाणे भिजल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. तसेच जनरल स्टोअर्स, पानटपरी, चहा हॉटेल, कापड दुकान, फ्रूटचे दुकान आदींमध्येही पाणी शिरल्याने नुकसान झाले. परिसरात झालेल्या नुकसानाचा तलाठय़ांनी सर्व्हे सुरू केला.