शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पाऊस पडेना..अधिकारी मिळेना

By admin | Updated: July 4, 2014 00:44 IST

कृषी कार्यालयात कर्मचार्‍यांचा दुष्काळ

आकोट: कृषी उत्पादन वाढीसाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शनाची निकड लक्षात घेऊन उघडलेल्या आकोट तालुका कृषी कार्यालयात अधिकारी-कर्मचार्‍यांचा दुष्काळ पडला आहे. अधिकारी-कर्मचार्‍यांची ६७ पदे मंजूर असलेल्या तालुका कृषी कार्यालयात केवळ २८ कर्मचारीवर्ग उरला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सोडाच; पण तालुका कृषी अधिकारीसुद्धा कार्यरत नाहीतच. पण कार्यरत असलेले कर्मचारीसुद्धा प्रभार सांभाळण्यात वेळ मारून नेत आहेत. शेती क्षेत्राशी निगडित सर्व विभागांचा त्यात समावेश करून ग्रामीण भागात शेतीमधे उत्पादनवाढीसाठी शासनस्तरावरून आवश्यक ती मदत करण्याच्या उद्देशाने जुलै १८८३ मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. प्रशासकीय कामकाज, इतर विभागांशी संपर्क, संनियंत्रण व प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी सोयीसाठी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, उपविभाग स्तरावर उप विभागीय कृषी अधिकारी यांची कार्यालये उघडण्यात आली. आकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ६७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३0 महत्त्वाची पदे रिक्त आहेत. रिक्त पदामध्ये सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कृषी सहाय्यक, लिपिक, अनुरेखांक आदी महत्त्वाच्या पदाचा समावेश आहे. शिवाय कार्यरत असलेल्या ३७ पदापैंकी ८ जणांची बदली होऊन कार्यमुक्त झाले आहे. विशेष म्हणजे आकोट तालुका कृषी अधिकारी साळी व उपविभागीय कृषी अधिकारी गायकवाड हेसुद्धा बदली होऊन कार्यमुक्त झाले; परंतु त्याच्या जागी अद्याप कोणी रुजू झाले नाही. शेतकर्‍यांच्या सुलभ संपर्कासाठी आवश्यक असलेले कृषी सहायक भोई, डोईफोडे, कुमावात, बाजाड, राजनकर, निमकर, करवते मालसुरे यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे; परंतु त्याच्या जागी अद्याप बदलीवर आलेले कृषी सहाय्यक व अधिकारी हे रुजू झाले नाहीत. त्यामुळे उर्वरित कर्मचार्‍यांना अतिरिक्त प्रभार सांभाळावा लागत असल्याने शेतकर्‍यांच्या कामांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. सुधारित तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोचवण्यासाठी आखलेल्या पीक प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटी, प्रचारसभा, चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने इत्यादी कार्यक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी विभागावर आहे. पाऊस पडत नसल्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करीत जनजागृती करण्याची जबाबदारी तालुका कृषी कार्यालयाची आहे; परंतु कृषी कार्यालयातच रिक्त असलेल्या पदाचा दृष्काळ पडल्यामुळे शेतकर्‍यांना मार्गदर्शन कसे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.** आकोट नकोच!आकोट येथे तालुका कृषी कार्यालयात काम करण्यास कोणताही अधिकारी-कर्मचारी उत्सुक दिसत नाही. माहितीचे अधिकार, निर्थक तक्रारी यामुळे कार्यालयातील अधिकारी वैतागले आहेत. त्यामुळे एकंदरीत वातावरण पाहता अनेक कर्मचार्‍यांनी येथून काढता पाय घेतला. शिवाय बदलीवर आलेले कर्मचारीसुद्धा आकोट नको म्हणत पर्यायी व्यवस्था शोधत आहे. आकोट येथे तालुका कृषी अधिकारी साळी वगळता कायमस्वरूपी एकही अधिकारी जास्त काळ टिकला नाही.