शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
4
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
5
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
6
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
7
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
8
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
9
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
10
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
11
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
12
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
13
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
14
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
15
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
16
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
17
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
18
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
19
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
20
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...

वाशिम जिल्हय़ातील राकॉँ नेत्यांचा मुंबईत तळ!

By admin | Updated: September 7, 2014 22:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची मुबंई येथे प्रचारास सुरवात; वाशिम जिल्ह्यातील नेतेमंडळीचा सामावेश.

वाशिम : काँग्रेसने स्वतंत्ररीत्या प्रचाराचा नारळ फोडताच, राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रचाराची तुतारी फुंकली असून, शनिवारी झालेल्या मुंबईतील या कार्यक्रमाला जिल्हय़ातील राष्ट्रवादीच्या झाडून नेत्यांनी हजेरी लावली. यात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा समावेश असून, उमेदवारीसाठी काहींनी थेट शरद पवार यांच्याकडे वशिला लावल्याचे वृत्त आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडीत केवळ कारंजा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाट्यावर आहे. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसल्याने जिल्हय़ातील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकार्‍यांना उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील तिन्ही मतदारसंघात उमेदवारीसाठी पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, सध्यातरी राष्ट्रवादी कॉग्रेसने कारंजा मतदार संघात निवडणूकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र येथे संभाव्य बंडखोरी पक्षाची डोकेदुखी वाढविणारी आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यावरच आघाडीचे चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत सर्वच पक्षाचा कस लागणार असल्याने प्रत्येक पक्षाने फुकून पावले टाकणे सुरू केले आहे. त्यामुळे कोणीच आपले पत्ते खोलायला तयार नाहीत. त्यामुळे इच्छुकांचे आघाडीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. येणार्‍या दोन दिवसात आघाडीच चित्र स्पष्ट होणार असल्याचे बोलल्या जात आहे.