शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

फुंडकरांनी प्रतिज्ञापत्रात माहिती दडवली!

By admin | Updated: June 20, 2016 02:03 IST

माजी आमदार सानंदा यांचा आरोप

खामगाव: विधान परिषदेच्या निवडणुकीत उभे राहण्याकरिता आमदार भाऊसाहेब फुंडकर यांनी १0 मार्च २0१४ रोजी सादर केलेल्या स्वत:च्या शपथपत्रामध्ये राज्य सहकारी बँकेसंबंधी व त्यांच्यावर दाखल असलेले इतर गुन्हे लपविल्याचा आरोप माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला आहे. राज्य सहकारी बँकेतील १६00 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील यांच्यासह आजी, माजी ७६ संचालकांना दोषी ठरवून त्यांच्यावर आर्थिक जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. या प्रकरणात आमदार भाऊसाहेब फुंडकरांवर ४ कोटी रुपयांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आल्याचेही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.राज्य सहकारी बँकेतील १६00 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात सन २00१ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार राज्य सरकारने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून चौकशीचा आदेश दिला होता. या घोटाळ्याच्या प्राथमिक चौकशीत तत्कालीन संचालक मंडळ दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, सहकार विभागाने सहकार कायद्याच्या कलम ८८ अन्वये दोषी संचालकांवर नुकसानाची जबाबदारी निश्‍चित केली. या संस्थेत त्यावेळी संचालक म्हणून भाऊसाहेब फुंडकर असल्यामुळे त्यांच्यावरही ४ कोटी रुपयांची जबाबदारी निश्‍चित झाली आहे. तसेच निवडणुकीसाठी खोटे प्रतिज्ञापत्रही फुंडकरांनी दाखल केल्याचा आरोपही माजी आमदार सानंदा यांनी केला आहे.