शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिबिरांमधून केली ‘ब्रेस्ट कॅन्सर’बाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:27 IST

अकोला : दर दहा महिलांमागे एका महिलेला स्तनाच्या गाठीच्या आजाराने ग्रासले असून, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. महिला भीतीपोटी हा आजार लपवितात म्हणून महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी आतापर्यंत अकोला जिल्ह्यात सुमारे ३५ शिबिरे घेण्यात आली असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापिका कल्पना काळे (अस्वार) यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाभरात घेतली ३५ शिबिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दर दहा महिलांमागे एका महिलेला स्तनाच्या गाठीच्या आजाराने ग्रासले असून, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. महिला भीतीपोटी हा आजार लपवितात म्हणून महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी आतापर्यंत अकोला जिल्ह्यात सुमारे ३५ शिबिरे घेण्यात आली असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापिका कल्पना काळे (अस्वार) यांनी दिली.वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई यांच्याकडून आलेल्या सूचनेनुसार, अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्यावतीने जिल्हाभर स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत सुमारे ३५ शिबिरांमधून महिलांची तपासणी करून महिलांना या आजाराबाबतची माहिती देण्यात आली. १६ सप्टेंबर रोजी आपातापा प्राथमिक आरोग्य केंद्रात, १७ सप्टेंबर रोजी केशव नगरस्थित बदरखे क्लिनिक येथे, तर २0 सप्टेंबर रोजी महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करणारी शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये डॉ. कल्पना काळे (अस्वार) यांनी महिलांना स्तन कर्करोगाची माहिती देतानाच या आजाराची लक्षणे आणि कारणे याबाबतही सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी महिलांना स्वत: तपासणी कशी करावी, याचीही माहिती दिली. सुमारे १५0 च्यावर महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरांमध्ये परिचारिका स्वाती यादव यांनी आयब्रीस्ट मशीनद्वारे महिलांची तपासणी केली असता पाच महिलांना हा आजार झाल्याचे आढळून आले. त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे संदर्भीत करण्यात आल्याची माहितीही डॉ. काळे यांनी दिली.

दहा महिलांमागे एकीला ‘ब्रेस्ट कॅन्सर’दर दहा महिलांच्या मागे एका महिलेला हा स्तनाचा कर्करोग झाल्याचे दिसून येत आहे, ही चिंतेची बाब असून, महिलांनी हा आजार लपवून न ठेवता त्याची लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा कोणत्याही सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी आणि भविष्यात होणारा संभाव्य धोका टाळावा, असे आवाहन डॉ. कल्पना काळे यांनी केले आहे.