शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पं. स. सभापतीपदांसाठी रस्सीखेच सुरू!

By admin | Updated: June 25, 2016 02:13 IST

अकोला जिल्हय़ातील सातही पंचायत समितींच्या सभापती-उपसभापतींची निवड २८ जून रोजी.

संतोष येलकर / अकोलाजिल्हय़ातील सातही पंचायत समितींच्या सभापती-उपसभापतींची निवड २८ जून रोजी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ात सुरू झालेल्या विविध राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीत सभापतिपदांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समितींच्या विद्यमान सभापती व उपसभापतींचा अडीच वर्षांचा कालावधी येत्या २७ जून रोजी संपत आहे. या पृष्ठभूमीवर पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी पंचायत समितींच्या नवीन सभापती व उपसभापतींची निवड २८ जून रोजी बोलविण्यात आलेल्या पंचायत समितींच्या विशेष सभेत करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ातील सातही पंचायत समितींच्या सभापतिपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण २३ जून रोजी जाहीर करण्यात आले. आरक्षण निश्‍चित झाल्यानंतर आणि सभापती-उपसभापतींच्या निवडीसाठी चार दिवसांचा कालावधी उरला असताना, पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी विविध राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सभापतिपद मिळविण्यासाठी आवश्यक असलेले सदस्यांच्या संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासह विविध राजकीय राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये सदस्य संख्याबळाच्या आधारे संबंधित राजकीय पक्षांकडून सभापतिपद मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या समीकरणांची चाचपणी करण्यात राजकीय पुढार्‍यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी पक्षनिहाय पंचायत समिती सदस्यांच्या गोपनीय बैठका आणि सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती आली आली. त्यामुळे जिल्हय़ातील सातही तालुक्यात सुरू झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये सभापतिपदांसाठी दावेदारांकडून रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे.