शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत वीज वाहिनीसाठी ११ लाखांची तरतूद

By admin | Updated: July 5, 2017 01:24 IST

गोवर्धन शर्मा यांचा पुढाकार: टिळक रोडचा तिढा निकाली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहराच्या मध्यभागी असलेल्या टिळक रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या वीज वाहिन्या, विद्युत खांब हटवून त्या ठिकाणी नवीन भूमिगत वीज वाहिनीचे जाळे टाकण्यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी ११ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे टिळक रोडच्या रुंदीकरणाला गती येणार असल्याचे दिसत आहे.मागील वर्षभरापासून शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीला वेग आला आहे. भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्ते दुरुस्तीला प्राधान्य दिले असून, त्याकरिता शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असल्याचे दिसून येते. प्रमुख रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता सिमेंट रस्त्यांचे निर्माण कार्य केले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने सिव्हिल लाइन रोड, दुर्गा चौक ते वसंत देसाई स्टेडियम, रतनलाल प्लॉट ते टॉवर चौक, माळीपुरा ते मोहता मिल रोड, श्रीवास्तव चौक ते डाबकी रोड, अशोक वाटिका ते तुकाराम चौक, नेहरू पार्क ते थेट दुर्गा चौक, मानव शोरूम ते सोमठाणा आदी प्रमुख रस्त्यांना प्राधान्य देण्यात आले. रस्ते दुरुस्तीनंतर त्यावर एलईडी पथदिवे लावले जात आहेत. याकरिता आवश्यक निधी खेचून आणण्यासाठी आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल शासनाकडे सतत पाठपुरावा करीत असल्याचे चित्र आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा म्हणून ओळख असणाऱ्या टिळक रोडच्या रुंदीकरणासाठी आ. गोवर्धन शर्मा यांनी आजवर १३ कोटींचा निधी खेचून आणला. सिटी कोतवाली ते शिवाजी महाविद्यालयापर्यंत प्रशस्त असा सिमेंट रोड तयार केला जात आहे. यादरम्यान, रस्त्याच्या मधात असणाऱ्या भूमिगत वीज वाहिन्या, विद्युत खांब हटविण्याचे रखडले होते. महावितरण कंपनीच्या स्तरावर कामकाज होत नसल्याचे पाहून आ. गोवर्धन शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सदर काम करण्याचे निर्देश दिले. यासाठी ११ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा अडथळा दूर झाला आहे. कार्यक्रमाला ठाणेदार शैलेश सपकाळ, फारूख भुरानी, हाजी इकबाल विंधाणी, हाजी जकरिया, आरीफ आमदानी, मजीद भुराणी, सोहेब लाखानी, जुनेद लाखानी, डॉ. असलम, डॉ. सत्तार, फिरोज अमादानी, हनीफ भाई, गुरफानभाई, हाजी अनीक, साबीर भाई, इब्राहीम चौहान, हाजी मुदाम, सिराज कुरेशी, फजल कुरेशी, शकूर लोधी, युनूस बकाली, लोकसेवासंघचे डॉ. योगेश साहू, सलिम मीर्झा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.टिळक रोडला खोदून सिमेंट रस्ता तयार केला जात आहे. त्या ठिकाणी असलेल्या वीज वाहिन्या, विद्युत खांब हटविताच शालिनी टॉकीज ते ब्रिजलाल बियाणी चौकपर्यंतचा रस्ता लवकरच पूर्ण केला जाईल.- आमदार गोवर्धन शर्मा