शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘८४ खेडी’ चालविण्याचा प्रस्ताव फेटाळला!

By admin | Updated: April 9, 2017 01:41 IST

मजीप्राने दिले जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला पत्र.

अकोला : खारपाणपट्टय़ातील गावांना पाणीपुरवठा करणारी ८४ खेडी प्रादेशिक योजना किमान पुढील चार महिने चालवावी, ७९ गावांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, असा जिल्हा परिषदेने दिलेला प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने फेटाळला आहे. योजना चालविणारच नाही, असेही स्पष्ट केल्याने जिल्हा परिषदेची गोची झाली आहे. अकोट ८४ खेडी योजनेतून अकोट, अकोला, तेल्हारा तालुक्यातील ७९ गावांना पाणीपुरवठा केला जातो. योजनेच्या निर्मितीपासून देखभाल व दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सुरू आहे. गेल्यावर्षी २0१५-१६ च्या टंचाईमध्ये योजनेला निधी मंजूर करतानाच तो हस्तांतरित करण्याचेही शासनाने बजावले. त्यावेळी १0 कोटी २0 लाख ७0 हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. टंचाई काळातील कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पूर्ण केल्यानंतर योजनेची देखभाल व दुरुस्ती, योजना व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचे आदेशात नमूद होते. टंचाईतील विशेष दुरुस्तीची कामे ३१ मार्च २0१७ रोजी पूर्ण झाली. शासनाच्या आदेशानुसार, ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग आधीच मोकळा होता. त्यामुळे जीवन प्राधिकरणाने जिल्हा परिषदेला १६ मार्च २0१७ रोजी पत्र दिले. त्यामध्ये १ एप्रिलपासून योजना हस्तांतरित करून घेण्याचे कळविण्यात आले. त्यानुसार ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजतापासून जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेने पाणीपुरवठय़ाचे काम बंद करण्याचा पवित्रा घेतला. ऐन उन्हाळ्यात योजना चालविण्याची जबाबदारी आल्याने पाणीपुरवठा विभाग अस्वस्थ झाला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी बैठक घेत पर्यायावर विचार करण्याचे सांगितले. सोबतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठांनाही पत्र दिले.त्यावर दोन ते तीन दिवसांनंतर निर्णय घेण्याचेही सांगितले. त्याचवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शासन निर्णयाचा हवाला देत योजना हस्तांतरित करणे आवश्यक आहे. यापुढे ती जिल्हा परिषदेनेच चालवावी, असे पत्र देत प्रस्ताव फेटाळला.