शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीचा प्रस्ताव तूर्तास स्थगित

By admin | Updated: September 3, 2015 01:56 IST

अकोला मनपाच्या सभेत सिटी बससह शहर विकासाच्या १५ प्रस्तावांना मंजुरी.

अकोला: भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू करण्यासाठी महापौर, उपमहापौरांसह सर्वपक्षीय गटनेत्यांची समिती स्थापन करून तूर्तास हा विषय स्थगित ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. समितीकडून प्राप्त होणार्‍या सूचना व हरकती लक्षात घेतल्यानंतर नवीन कर प्रणालीचा अवलंब केला जाणार असल्याचे महापौर उज्ज्वला देशमुख यांनी बुधवारी आयोजित विशेष सभेत स्पष्ट केले. या सोबतच स्थगित सर्वसाधारण सभेत सिटी बसचा प्रस्ताव मंजूर करण्यासह शहर विकासाच्या १५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मनपाच्या मुख्य सभागृहात दोन सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत सकाळी ११.३0 वाजता विशेष सभेसाठी दाखल झाले. याप्रसंगी महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल, सुनील मेश्राम यांच्यासह विरोधी पक्षनेता साजीद खान व इतर नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सभेला सुरुवात होताच, भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीच्या मुद्यावर जिल्हाधिकार्‍यांनी विस्तृत भूमिका मांडली. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. २00३ पासून शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन न झाल्याने मनपाच्या उत्पन्नाला खिळ बसली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर मनपाचा उर्वरित आर्थिक हिस्सा जमा करण्यासाठी करवाढ करावीच लागेल, असे मत जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केले. भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू झाल्यास दुप्पट कर वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. यावर काही भागात रेडिरेकनरचे दर केवळ ५00 रुपये असून, तर अनेक ठिकाणी २0 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी सांगितले. यामुळे कर वाढ झाल्यास तफावत निर्माण होईल. या विषयाला तत्त्वत: मान्यता आहे. परंतु त्यापूर्वी प्रशासनाने इत्थंभूत माहिती सादर करण्याची मागणी अग्रवाल यांनी केली. उपमहापौर विनोद मापारी, विरोधी पक्षनेता साजीद खान, भारिप-बमसंचे गटनेता गजानन गवई यांनीदेखील कर वाढीला विरोध दर्शविला. अखेर या विषयाचा अभ्यास करून सूचना व हरकती मागविण्यासाठी महापौर, उपमहापौर व सर्वपक्षीय गटनेत्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय महापौर उज्ज्वला देशमुख यांनी घेतला. समितीद्वारे शिफारशींचा अहवाल सभागृहात सादर केल्यानंतर ही कर प्रणाली लागू करण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.