शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बेघरांच्या निवाऱ्यासाठी २ कोटी २४ लाखांचा प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: April 13, 2017 02:07 IST

नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांची मंजुरी

अकोला : राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील बेघर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तात्पुरता निवारा देण्यासाठी महापालिकेच्यावतीने गरिबी निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यांच्या मुक्कामासाठी इमारतीचा ‘डीपीआर’(प्रकल्प अहवाल) तसेच नकाशा मंजूर झाला. त्यानुषंगाने मनपा प्रशासनाने तयार केलेला २ कोटी २४ लाखांच्या प्रस्तावाला नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी बुधवारी मंजुरी दिली.महापालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून शहरातील सुशिक्षित गरीब बेरोजगार युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्यासह शहरात बेघर राहणाऱ्या व्यक्तींना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. शहरातील बेघर व्यक्तींना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत प्रशासनाला निर्देश आहेत. प्रशासनाने दीडशे बेघर व्यक्तींचा शोध घेतल्यानंतर त्यांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी जागेचा शोध घेण्यात आला. बेघर व्यक्तींच्या इमारतीसाठी ज्या जागेचा शोध घेण्यात आला. त्या जागेवर इमारत उभारण्याकरिता प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. होमगार्ड कार्यालयाच्या जागेवर इमारत उभारणार असल्याने त्या जागेचा नकाशा मंजूर झाला होता. त्या पृष्ठभूमिवर मनपाच्या बांधकाम विभागाने इमारत बांधण्यासाठी सुरुवातीला तीन कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मनपाने प्रस्तावातील त्रुटी दूर केल्यानंतर २ कोटी २४ लाखांचा सुधारित प्रस्ताव नगर विकास विभागाकडे सादर केला असता, प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी बुधवारी मंजुरी दिली. यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत मनपाचे शहर अभियंता इक्बाल खान, प्रकल्प व्यवस्थापक संजय राजनकर उपस्थित होते. अधिकारी तडकाफडकी रवानाबेघरांना तात्पुरता निवारा देण्याची शासनाची योजना असून, इमारत बांधण्यासाठी मनपा प्रशासनाने शासनाकडे तीन कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. प्रस्तावातील त्रुटी दूर करण्याचे निर्देश देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला हजर होण्याचे आदेश नगर विकास विभागाने देताच मंगळवारी रात्री मनपाचे शहर अभियंता इक्बाल खान, प्रकल्प व्यवस्थापक संजय राजनकर मुंबईकडे रवाना झाले. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांसोबत पार पडलेल्या बैठकीत सुधारित प्रस्ताव मंजूर करण्यात आला.